अण्णांच्या खऱ्या बायकोपुढे शेवंताच्या रुपाचा जलवा फिका! बघा कशी दिसते अण्णांची खरीखुरी बायको..

रात्रीस खेळ चाले भाग एक आणि भाग दोन च्या उदंड यशानंतर रात्रीस खेळ चाले भाग तीन सध्या दाखवण्यात येत आहे. या मालिकेच्या या भागाला सुद्धा प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. मराठी मालिकासृष्टीत फार कमी भूताटकी मालिका येऊन गेल्या. त्यामुळे प्रेक्षकांना त्याच त्याच पठडीतल्या मालिकांमधे ही जरा वेगळी वाटते.

या मालिकेतला थरार हा त्यातल्या पात्रांनी भाग तीन मधेही टिकवून ठेवला. असे थरारातून होणारे मनोरंजन प्रेक्षकांना चांगलेच भावते आहे. या मालिकेतली अशीच दोन भन्नाट पात्रं म्हणजे अण्णा नाईक आणि शेवंता. या दोन्ही पात्रांविषयी बरीच चर्चा होताना दिसून येते.

अण्णा नाईक यांचे मूळ नाव हे माधव अभ्यंकर असे आहे. अण्णा नाईक हे मूळचे पुण्याचे आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरूवात नाटकांपासून सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांतून स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांचे काम पाहून त्यांचा चाहतावर्गही बनत गेला. माधव अभ्यंकर यांचा पहिला चित्रपट “विश्वविनायक” हा होता. त्यानंतर त्यांनी या गोल गोल डब्यातला, पोस्टर गर्ल, सुराज्य, तुकाराम आणि यारों की यारी’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमधे काम केले.

माधव अभ्यंकर हे दिसायला अगदी रूबाबदार आहेत. जसे ते रुबाबदार आहेत तशीच त्यांची मालिकेतील जोडीदार शेवंताही सुंदर आहे. पण त्यांची खऱ्या आयुष्यातली अर्धांगिनी ही शेवंताही तिच्यासमोर फिकी पडावी इतकी जास्त सुंदर आहे. माधव अभ्यंकरांच्या पत्नीचे सौंदर्य तुम्ही खालील फोटोमधून अनुभवू शकता. या फोटोमधे त्यांच्या दोघांचीही जोडी कमाल दिसत आहे.

माधव अभ्यंकर हे अत्यंत गुणी नट आहेत. त्यांनी रात्रीस खेळ चाले या मालिकेसाठी खास मालवणी भाषा आत्मसात केली. यासाठी त्यांनी बराच अभ्यास आणि सराव केला. त्यांना याआधी मालवणी भाषा अस्खलितपणे बोलायला यायची नाही. पण आता त्यांच्याकडे पाहता असे मुळीच वाटत नाही. ही खरे तर त्यांच्या कष्टाची फलश्रुती आहे.

अण्णांच्या आयुष्यातल्या याच खऱ्या बायकोचे नाव रेखा अभ्यंकर असे आहे. रेखा यांचा अभिनय क्षेत्राशी काहीही संबंध नाही. पण रेखा यांनी शेवंताला दिसण्याच्या शर्यतीत काहीशा फरकाने का होईना पण मात दिली आहे. माधव आणि रेखा अभ्यंकर यांचा संसार सुखाचा होवो. या शुभेच्छा.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.