मॅच दरम्यान विराट-अनुष्काच्या मुलीच्या व्हायरल झालेल्या फोटो वरती अनुष्का म्हणते की..

मित्रहो बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा खूपदा निरनिराळ्या कारणाने चर्चेत येत असते. तसेच तिचा पती विराट कोहली सुद्धा हल्ली विशेष चर्चेत आला आहे. आता भारताने कसोटीसोबत वन डे सिरीज देखील गमावली आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये विराट चर्चेचा विषय बनला आहे. अशातच आता त्याची मुलगी वामीका देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचा एक फोटो अनेकांच्या मोबाईलवर दिसून आला आहे.

View this post on Instagram

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

लाइव्ह मॅचचे प्रक्षेपण सुरू असतानाच नेमकं त्यावेळी कॅमेऱ्याने विरुष्काच्या लेकीला आपल्या कैदेत घेतले आहे. वामीकाचा सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहे. अनुष्का आणि वामीका दोघीही या फोटोमध्ये खूप छान दिसत आहेत. मात्र मुलीचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो पाहून अनुष्काने एक स्टोरी शेअर केली आहे. ही स्टोरी तिचे अनेक चाहते पाहत असून, खुपजनांनी यावर कमेंट देखील केली आहे.

मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहून, अनुष्का म्हणते की “आमच्या मुलीचा फोटो काल स्टेडियमवर क्लिक करण्यात आला होता आणि तो आता व्हायरल होत आहे. आम्हाला माहीत न्हवत कॅमेऱ्याची नजर आमच्यावर आहे.” एवढं बोलून अनुष्का पुढे म्हणते की “मुलीच्या फोटोवर आमची भूमिका पूर्वीसारखीच आहे. आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही वामीकाचे फोटो क्लिक किंवा प्रिंट करू नये. यामागचे कारण आम्ही आधीच तुम्हाला सांगितले आहे.”

अनुष्काच्या स्टोरीवर भरपूर लोकांनी कमेंट केली असून, सोशल मीडियावर सर्वत्र विशेष चर्चा सुरू आहे. तिच्या सर्व चाहत्यांनी या व्हायरल फोटोला भरपूर लाईक दिले आहेत. शिवाय अनुष्का आणि विराट हे नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते दोघेही आपले काही फोटो चाहत्यांना शेअर करत असतात. अनुष्का, विराट, आणि वामीका या तिघांनाही त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.