‘आई विश्वसुंदरी असल्याचा परिणाम आराध्याला भोगावा लागत आहे’ जया बच्चन यांची कबुली…

अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचा लग्नसोहळा हा बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या विवाहसोहळ्यांपैकी एक होता. मुळात दिग्गज अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांची सून कोण होणार याबद्दल आधीच चर्चांना उधाण आलं होतं. अभिषेक आणि ऐश्वर्या यांचं लग्न ठरल्यावर त्यावर अनेक बाजूंनी चर्चासत्रं झडली होती. अखेर अनेक उलटसुलट चर्चा आणि अफवांनंतर २००७ मध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या यांचा विवाहसोहळा थाटात पार पडला.

यथावकाश दोघांना एक मुलगी झाली. १६ नोव्हेंबर २०११ रोजी ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला. द ग्रेट बच्चन कुटुंबात जन्माला आल्याने जन्माला येण्याआधी पासूनच आराध्या लोकप्रिय झाली होती. या वर्षी ती १० वर्षांची झाली. आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी ती आपल्या आईबाबांबरोबर मालदीवला गेली होती. आराध्या संपूर्ण बच्चन कुटुंबाची प्रचंड लाडकी आहे. विशेष करून आपल्या आजी-आजोबांची.

यंदाच्या ‘कौन बनेगा करोडपती १३’ मध्ये होस्ट अमिताभ बच्चन आपल्या नातीबद्दल भरभरून बोलताना दिसून आले. त्यांनी सांगितले, की आराध्याची आजी तिची खूप काळजी घेते. आराध्याचा जन्म झाल्यापासूनच लोकांनी तिच्याकडून अपेक्षा ठेवायला सुरुवात केली आहे. स्टार कपलची, विशेषतः विश्वसुंदरीची मुलगी असल्याने मोठी झाल्यावर आराध्या देखील आपल्या आईसारखीच सुंदर दिसेल का, असा प्रश्न अनेकांना तिच्या जन्मापासूनच पडला आहे.

लोक नेहमीच आराध्याची तुलना तिच्या आईशी म्हणजेच ऐश्वर्याशी करत असतात. आराध्यामध्ये ज्युनियर ऐश्वर्या दिसते का, हे पाहण्याचा लोक आटोकाट प्रयत्न करत असतात. याबाबत आराध्याची आजी जया बच्चन यांना प्रश्न विचारण्यात आला, ज्यावर त्यांनी खूप स्पष्ट उत्तर दिलं. त्यांना विचारण्यात आलं, की आराध्या मोठी झाल्यावर आपल्या आईसारखी दिसेल का. यावर जया बच्चन म्हणाल्या, “आराध्या अजून खूप लहान आहे. ती खूप निरागस आणि क्यूट आहे. परंतु लोक आतापासूनच तिच्यामध्ये तिच्या आईवडिलांचे गुण पाहायला टपले आहेत. जास्तीत जास्त लोकांना तर त्यांना आराध्या मध्ये आपल्या आईचे सौंदर्य दिसावे, असेच वाटते. आराध्याची उंची जास्त आहे. त्यामुळे तिच्यात तिच्या आई आणि वडिलांचे दोघांचे लूक्स दिसतात.”

यावेळी आपल्या सुनेची तारीफ करायला जया बच्चन विसरल्या नाहीत. त्या म्हणाल्या, “माझी सून जितकी सुंदर आहे तितकीच ती संस्कारी आणि एक जबाबदार आईसुद्धा आहे. आपल्या मुलीचे सर्व काम ती स्वतः करते. आराध्याच्या बाबतीत तिला कुणाचाही हस्तक्षेप चालत नाही. एक विश्वसुंदरी आई म्हणून लाभली असल्याने आराध्या खूपच भाग्यवान आहे.”