एकेकाळी गाताना स्टेजवर हाकलून दिले होते, मात्र आज आहे बॉलीवूड मधील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत गायक.

अरिजित सिंह बॉलिवूडच्या अशा गायकानं पैकी आहेत ज्यांना आपली ओळख बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. आज जरी अरिजित सिंह हे आपल्या आवाजाने लोकांच्या मनावर राज्य करत असले तरीही एक वेळ अशी होती की अरिजित सिंह यांना चित्रपटात गायनासाठी खूप संघर्ष करावा लागला.

आपल्या दमावर ओळख निर्माण करणाऱ्या अरिजित सिंह यांचा वाढदिवस 25 एप्रिल ला असतो. अरिजित सिंह यांच्याविषयी असे सांगितले जाते की त्यांच्या आवाजा मध्ये मधुरता,प्रेम व वेदना आहेत ज्यामुळे ऐकणारा त्यांच्या आवाजाने मोहित होतो.चलातर त्यांचा करियर विषयी माहिती करून घेऊ.

अरिजीत यांना संगीताचा वारसा मिळालेला आहे. त्यांची आई गायिका होती व त्यांचे मामा तबलावादक होते.त्यांचा आजींना ही भारतीय सांस्कृतिक संगीतामध्ये रुची होती. यानंतर अरिजित यांनीही निर्णय घेतला की ते आपले करियर संगीत क्षेत्रातच करणार. तथापि त्यांचासाठी इंडस्ट्रीत स्थान मिळवणे सोपी गोष्ट नव्हती.

सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘सांवरिया’ चित्रपटात गायलेले गाणे चित्रपटातून एन वेळी काढून टाकण्यात आले होते व टिप्स ने त्यांच्या सर्वात पहिला अल्बम रेकॉर्ड केला होता तो रिलीज केला नव्हता. त्यांना सर्वात पहिले रिजेक्शन मिळाले सिंगिंग रियालिटी शो ‘फेम गुरुकुल’ मध्ये.

अरिजितने आपले गुरु राजेंद्र प्रसाद हजारी यांच्या सांगण्यावरून रियालिटी शो ‘फेम गुरुकुल’ मध्ये भाग घेतला होता. या शोमध्ये त्यांच्या आवाजाला पसंती जरूर मिळाली परंतु हा शो ते जिंकू शकले नाही.अरिजित सिंह टॉप ५ पर्यन्त पोहचले नंतर त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. शंकर महादेवन त्यांच्या गायकीतून प्रभावित झाले होते. अशातच हाईस्कुल म्युझिकल २ च्या अल्बमसाठी त्यांना एक गाणं ऑफर केल होत.

यानंतर अरिजित यांनी खूपच गाणे गायले व त्यांना कंटेंट सुद्धा मिळू लागले. त्यांनी प्रीतम व विशाल शेखर यांचा सोबत म्युझिक प्रोग्रामरच पण काम केले आहे.चित्रपट आशिकी २ मध्ये त्यांना गाणं गाण्याची संधी मिळाली. या चित्रपटातील ‘तुम ही हो ‘ या गाण्याने त्यांना रातो-रात मोठा स्टार बनवला.या नंतर अरिजित साठी बॉलीवूड चे दरवाजे उघडले.

‘तुम ही हो’ या गाण्या नंतर अरिजित सिंह यांनी हिट गाण्याची लाईनच लावली. त्यांनी गायलेले गाणे ‘ फिर भी तुमको चाहूंगा’, ‘पछताओगे’, ‘पल’, ‘खैरियत’, ‘सोच ना सके’, ‘इलाही’, ‘हमारी अधूरी कहानी’ या गाण्यानी लोकांची मने जिंकली.

वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.