आश्चर्यकारक! तब्बल १६ मुलांचे बनले आईवडील..आता १७ व्या मुलाची चाललीय तयारी..

मित्रहो अनेकांना लहान मुलांची प्रचंड आवड असते, त्यांचे बोबडे बोल घरातून घुमावे असे प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळे लग्न झाल्यावर देखील प्रत्येक जोडप्याला वाटते की आपले कुटुंब पूर्ण करत एक चिमुकले पाऊल घरात पडावे. ज्यांना मुलांची जास्त आवड असते त्यांच्या घरी ३,४ मुलं असतातच पण मित्रहो एकाच जोडप्याला तब्बल १६ मुले असल्याचे ऐकून कोणीही थक्क होऊन जाईल. कारण आजच्या घडीला १ किंवा जास्तीत जास्त २ मुले म्हणजे बास म्हणतात पण या जोडप्याला १ न्हवे २ न्हवे तर तब्बल १६ मुले झाली आहेत. त्यामुळे हे ऐकून सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

१६ मुले असूनही आता १७ मुलाची तयारी केली जात आहे. द मिररमधील वृत्तानुसार कॅरोलीनामध्ये राहणारी महिला पॅटी हर्नांडेज ही ४० वर्षाची असून तिचा पती कार्लोस हा ३९ वर्षाचा आहे. या दोघांनी जवळपास १६ मुलांना जन्म दिला असून, त्यांचे संगोपन तर करत आहेतच शिवाय आता त्यांच्या १७ मुलाची ते तयारी करत आहेत. पॅटीला असा विश्वास आहे की आपण पुन्हा नक्की प्रेग्नंट होऊ शकतो. विशेष म्हणजे या सर्व मुलांची नवे सी ने सुरू होतात. याचे कारण असे की त्यांच्या वडिलांचे नाव सी ने सुरू झाले आहे. त्यामुळे त्यांच्या नावावरून असे नाव देण्यात आले आहे.

याबद्दल पॅटी बोलताना म्हणते की “आम्ही सतराव्या बाळासाठी प्रयत्न करत आहोत. आम्हाला नेहमीच एक मोठं कुटुंब हवं होतं. पण कधी वाटलं न्हवत की देव आम्हाला इतका आशीर्वाद देईल. मी पुन्हा प्रेग्नंट होईन असा मला विश्वास आहे कारण माझा देवावर विश्वास आहे. आम्ही देवाची इच्छा पूर्ण करत आहोत आणि जर त्यांची इच्छा असेल तर त्यांनी आमच्या कुटुंबाचा आणखी विस्तार करावा अशी आम्ही प्रार्थना करतो.” तिच्या या वक्तव्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं असून काहींनी सकारात्मक प्रतिक्रिया देखील दिली आहे.

पुढे ती म्हणते की “सतराव्या मुलाचं नाव सुद्धा ठरवलं आहे, जर तो मुलगा असेल तर कार्टन आणि जर ती मुलगी असेल तर क्लेअर असे ठेवण्यात येईल.” हे कपल आपल्या बाळांवर खूप प्रेम करते, त्यांनी तीन वेळा जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. कार्ला-कॅटलीन, केल्व्हीन-कॅथरीन, कालेब-कॅरोलीन अशी त्यांची नावे असून इतर मुलांची नावे क्रिस्टोफर, क्रिस्टीयन, सेलेस्ट, क्रिस्टिना, कॅरल, कॅमीला, चार्लोट अशी नावे मुलांना देण्यात आली आहेत. पॅटीने गेल्याच वर्षी आपला १६ वा मुलगा क्लेटन याला जन्म दिला होता.

source: zee news

त्यांचे हे कुटुंब जवळपास आता १८ जणांचे झाले आहे, एवढे मोठे कुटुंब हे दोघे पतिपत्नी उत्तम रित्या सांभाळतात. आपल्या मुलांवर त्यांचा खूप जीव आहे, नेहमी त्यांच्या सगळ्या इच्छा ते पूर्ण करत असतात. पण इतक्या मुलांना पाहून नेहमीच अनेक लोक आश्चर्य व्यक्त करत असतात. हे कुटुंब नेहमी असेच हसत खेळत राहो ही सदिच्छा. या सर्वानाच भरभरून आयुष्य व त्यामध्ये भरभरून आनंद मिळत राहो. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.