अशोक सराफ यांचा मुलगा आहे चक्क ‘या’ क्षेत्रात! पहा त्याची ‘टेस्टी’ कामगिरी…

अनेकदा स्टार्सच्या मुलांचा देखील स्टार बनण्याकडेच कल असतो. सध्या मराठी इंडस्ट्री मध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत. काही स्टार्सची मुलं मात्र काही वेगळ्या वाटांवर वाटचाल करू लागतात. ते केवळ ही वाटचाल करून थांबत नाहीत, तर अशा वाटांवर दुसऱ्यांसाठी काही मैलाचे दगड रचून ठेवतात जेणेकरून ज्यांना या वाटेवर यायचे आहे, त्यांचा या वाटेवरचा प्रवास सुखकर होईल. असंच एक उदाहरण आहे दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांच्या मुलाचं.

आई-वडील दोघेही अभिनय क्षेत्रात असताना त्यांचा मुलगाही याच क्षेत्रात येईल असे बऱ्याच जणांना वाटत होते. मात्र तसे झाले नाही. अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ ही जोडी म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत गाजलेली जोडी. आपल्या अभिनयाने या दोघांनीही मराठी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. केवळ मराठीच नाही, तर हिंदी चित्रपटसृष्टीतही या दोघांनी बरंच नाव कमावलेलं आहे. ही जोडी जशी ऑन-स्क्रीन लोकप्रिय आहे, तशी ती ऑफ-स्क्रीन देखील प्रसिद्ध आहे.

या दोघांना अनिकेत नावाचा एक मुलगा आहे. सगळ्यांनाच अपेक्षा होती की या दिग्गज आणि मुरलेल्या कलाकारांचा हा मुलगा आपल्या आई-वडीलांच्या पावलावर पाऊल टाकून सिनेसृष्टीत पदार्पण करेल. मात्र सगळ्यांच्या अपेक्षांना बाजूला ठेवत अनिकेत चक्क पाककलेत पारंगत झाला आहे. वाटलं ना आश्चर्य? अनेकदा आपण निवेदिता सराफ यांचे पाककृतींचे व्हिडिओ युट्यूबला बघतो. आपल्या आईचा हा गुण घेत अनिकेतही पाककलेत आपले करिअर करत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nick Saraf (@nicksaraf)

अनिकेत मनोरंजनसृष्टी पासून बराच दूर आहे. त्याला अभिनय, दिग्दर्शन किंवा चित्रपट निर्मितीत कोणताही रस नाही. त्याला रस आहे तो वेगवेगळ्या डिशेसची निर्मिती करण्यामध्ये. कारण अनिकेत एक शेफ आहे. युट्यूब वर ‘निक सराफस् फूडलॉग’ या नावाने त्याच्या अनेक रेसिपीज तुम्हाला पाहता येतील. निवेदिता सराफ आपल्या युट्यूब चॅनेल वर नेहमी मराठी पद्धतीच्या रेसिपीज बनवताना दिसतात. अनिकेत मात्र पाश्चिमात्य रेसिपीजचा चाहता आहे. त्याच्या अनेक पश्चिमात्य रेसिपीज आपण युट्यूब वर पाहू शकतो.

युट्यूब बरोबरच अनिकेत आपल्या भन्नाट रेसिपीज इंस्टाग्रामवर देखील शेअर करत असतो. त्याच्या या व्हिडिओजना खूप सारे व्ह्यूज मिळतात. खूप लोकांनी त्याच्या रेसिपीजचे कौतुक केले आहे. मंडळी, तुम्हीही अनिकेतच्या या रेसिपीज ट्राय करून पाहा आणि त्या कशा आहेत हे आम्हाला नक्की कळवा.