‘लोक लगेच विसरून जातात…’साखरपुड्यातील शहनाझच्या डान्सवर आसिम रियाझची संतप्त प्रतिक्रिया!

काही काळापूर्वी सगळ्यांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे दुःखद निधन झाले होते. त्याच्या जाण्याचा धक्का अनेकांना बसला. त्याची पूर्व-प्रेयसी शहनाझ गिलला देखील जबरदस्त धक्का बसला होता. त्यातून सावरायला तिला बराच वेळ लागला. अलीकडेच ती एका कार्यक्रमात डान्स करताना दिसली. ‘बिग बॉस १३’ फेम आसिम रियाझने मात्र तिला यावरून फटकारले आहे. आसिम रियाझ आणि सिद्धार्थ शुक्ला ‘बिग बॉस १३’ मध्ये एकत्र होते. सिद्धार्थ शुक्लाने ‘बिग बॉस १३’ हा शो जिंकला होता.

शहनाझ गिल ही अलीकडेच एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात थिरकताना दिसली. मराठी चित्रपट ‘सैराट’ मधील ‘झिंगाट’ गाण्यावर ती डान्स करताना दिसली. यावर आसिम रियाझने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याने ट्विट करत सांगितले, की ‘आताच काही डान्सिंग क्लिप्स पाहिल्या. आपल्या प्रेमाच्या माणसांना लोक किती पटकन विसरतात. नवीन जग.’

केवळ आसिम रियाझच नाही, तर अनेक नेटकरी तिला यावरून ट्रोल करताना दिसत आहेत. आसिम रियाझच्या कमेंटमुळे मात्र सगळ्यांचेच या घटनेकडे लक्ष वेधले गेले आहे. आसिम रियाझच्या या ट्विट नंतर शहनाझ गिलने देखील त्याला रिप्लाय करत म्हटलं आहे, “हास्य हा एक उत्तम उपचार आहे.” आता यावर अजून आसिम रियाझने काही उत्तर दिलं नाहीये. मात्र या सगळ्या प्रकारामुळे शहनाझ गिल मात्र पुन्हा चर्चेत आलेली दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर बराच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by BiggBoss 15 (@colorstvbigboss15_voot)

२ सप्टेंबर २०२१ रोजी सिद्धार्थ शुक्लाचा अचानक मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूच्या वेळी तो ४० वर्षांचा होता. त्याच्या अशा अचानक जाण्याने मनोरंजनसृष्टी हळहळली होती. अनेकांनी यावर दुःख व्यक्त करत सिद्धार्थच्या जाण्यावर शोक व्यक्त केला होता. चाहत्यांनाही बराच धक्का बसला होता. ‘बालिका वधू’ या मालिकेद्वारे सिद्धार्थने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. ‘हमटी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूड मध्येही पदार्पण केले होते. त्याच्या अचानक जाण्याने मनोरंजनसृष्टीमध्ये पोकळी निर्माण झाल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली होती.

तुमच्या आवडत्या कलाकारांच्या बाबतीतले असेच काही किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया पेजेसना नक्की फॉलो करा. तसेच तुम्हाला आमचे लेख आवडल्यास ते कळवण्यास विसरू नका. आमचे तुम्हाला आवडलेले लेख लाईक आणि शेअर जरूर करा.