हिंदुस्तानी भाऊंच्या नावाने सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल, वकिलांनी दिले स्पष्टीकरण.

आताच मिळालेल्या मीडिया न्यूजच्या माहितीनुसार हिंदुस्तानी भाऊ यांना अटक करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपूर्वी हिंदुस्तानी भाऊ यांनी दहावी बारावी पेपर ऑफलाईन होऊ नये. अन्यथा शिक्षणमत्र्यांविरोधात निर्दशन करु अशी चेतावणी दिली होती. त्यानंतर सोमवारी धारावी याठिकाणी गोल्डफिल्ड टॉवर येथे विद्यार्थी आंदोलन भरले होते. पण यानंतर महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या करोना नियमांचे उल्लंघन केले असल्याने सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सोशलमीडियावर आपल्या शाब्दिक चकमकीमुळे खूप फेमस असलेला हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठकने विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यासाठी भडकवले सांगून हिंदुस्तानी भाऊ आणि दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हिंदुस्तानी भाऊ सोबत इतर दोन लोकांना अटक केलेल्यांची नावे आहेत इकरार खान आणि वकार खान. चेतावणी देणे, पोलिसांवर दगडफेक करणे, जमाव जमवणे, खाजगी आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे. असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत यासंदर्भात त्यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धारावी येथे आंदोलन होत असताना एका पोलीस शिपायाला मारहाण करण्यात आली आहे त्याचबरोबर पोलिसांवर दगडफेक केली होती. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेली ७५ वर्षीय महिला भाजी विक्रेती जखमी झाली.

हिंदुस्तानी भाऊच्या अटकेनंतर एक सोशल मीडियावर मॅसेज व्हायरल होत आहे तो असा की ‘हिंदुस्तानी भाऊने आपल्यासाठी हे सर्व काही केले, विद्यार्थ्यांनच्यासाठी भाऊंना अटक झाली आता सगळ्या विद्यार्थ्यांनी पुढे येऊन काही केले पाहिजे. अश्या परिस्थितीत सर्व विद्यार्थ्यांनी धारावी पोलीस स्टेशनजवळ आज दुपारी १२ वाजता जमा होण्याचे आवाहन करणारी क्लिप सध्या व्हायरल होत आहे. असा खुलासा हिंदुस्तानी भाऊंचे वकील अशोक मुळे यांनी केला आहे.

वकील अशोक मुळे व्हायरल होणाऱ्या मॅसेजबद्दल म्हणाले की, मी आताच हिंदुस्तानी भाऊ यांची भेट घेतली आहे. काही समाज विरहक लोक भाऊंच्या नावाने विद्यार्थ्यांना भडकवत आहेत. हिंदुस्तानी भाऊ यांच्याकडून त्यांच्या चाहत्यांना आवाहन करण्यात येत आहे की, मी जोपर्यंत स्वतः बाहेर येऊन मी नवीन व्हिडिओ बनवून पोस्ट करत नाही तोपर्यंत माझ्या वतीने कोणत्याही केलेल्या आवाहन मॅसेजला बळी पडू नका. कोण्ही आंदोलन करू नये एकत्र येऊ नये. माझ्या नावाने काही लोक पोलिसांना त्रास देत आहेत आणि परिस्थिती बिघडवण्याचा पर्यंत करत आहेत. मी स्वतः बाहेर आल्यानंतर या गोष्टीवर बोलेन असे हिंदुस्तानी भाऊंचे वकील अशोक मुळे म्हणाले.