एकेकाळी पैसे मिळवण्यासाठी ट्रेनमध्ये गाणं गायचा आयुष्मान खुराणा, आज आहे कोट्यवधी रुपयांची मालक…

माणसाची परिस्थिती माणसाला काय करायला लावेल याचा काही नेम नसतो पण अथक कष्ट आणि सात्यत्य ठेवलं की माणसाला यश मिळत. आधीच्या काळात कोणतीही नवीन गोष्ट ही खूप चर्चेचा विषय ठरायची कामासाठी लोकं मिळायची नाहीत, शूटिंगसाठी बायका मिळायच्या नाहीत मिळेल त्यांना घेऊन काहीतरी करू पाहणारे लोक आधी होते. पण आता तस नाही आहे आता ही फिल्म इंडस्ट्री खूप लोकांपासून व्यापली आहे इथे जर तुम्हाला डोके वर काढायचे असेल तर त्यासाठी खूप कष्ट करावे लागत असतात. काही बॉलिवूड मधील अभिनेते आज यशाच्या शिखरावर असताना तुम्ही पाहत असाल पण याआधी ते काय करायचे हेच आम्ही आज बोलणार आहोत. इतक्या साऱ्या कष्टातून त्यांनी कसे यश मिळवले याची प्रेरणादायी कहाणी जाणून घेऊया या सुप्रसिद्ध कलाकारांच्या जुबानी!

रेडिओ जॉकी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारे बॉलिवूड अभिनेते आयुष्मान खुराना यांनी आपल्या शानदार अभिनयाद्वारे बॉलिवूडमध्ये एक विशेष स्थान बनवले आहे. आजच्या काळात आयुष्मान खुराना बॉलिवूडच्या सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यांच्यासोबत प्रत्येकाला काम करायचे आहे. १४ सप्टेंबर १९८६ रोजी चंदीगड येथे जन्मलेल्या आयुष्मान खुराना यांना फिल्मफेअर पुरस्कारापासून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले आयुष्मान खुराना आज कोट्यवधींच्या मालमत्तेचे मालक आहेत. हे खरे आहे. आयुष्मान खुराना यांचे मुंबईत एक आलिशान आणि अतिशय सुंदर घर आहे ज्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे. याशिवाय त्याच्याकडे अनेक लक्झरी कार्स आहेत. माहितीनुसार सध्या आयुष्मान खुराना यांच्याकडे ४३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे असे समजले आहे.

चित्रपटांव्यतिरिक्त आयुष्मान खुराना जाहिराती आणि ब्रँड एंडोर्समेंटद्वारे भरपूर कमाई करत असतात. सध्या आयुष्मान फक्त एका चित्रपटासाठी ३ ते ४ कोटी रुपये मानधन घेत असतात, तर ब्रँड एंडोर्समेंटसाठी १ कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे स्वीकारतात, आयुष्मान खुराना दरमहा ५० लाख रुपयांपेक्षा जास्त कमावतात तर एका वर्षात ६ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करतात. ते गाडीचे देखील खूप शौकीन आहेत त्यांच्याकडे सध्या बीएमडब्ल्यू ५ सीरीज कार, ऑडी A6, औरमर्सडिज बेंज-एस क्लास अश्या नावजलेल्या कार्स आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

पण म्हणतात ना असा हिरा निर्माण होण्यासाठी त्याला आधी खूप जिझावे लागते, आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात आयुष्मान खुराना यांच्याकडे स्वतःचा पॉकेटमनीही नसायचा. त्याच्या संघर्षाचे दिवस आठवत आयुष्मान खुराना यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की एकदा ते त्यांच्या कॉलेजच्या ग्रुपसोबत गोव्याला गेले होते. या काळात त्याच्याकडे सहलीसाठी पुरेसे पैसे नव्हते. अशा परिस्थितीत त्यांनी पैसे गोळा करण्यासाठी ट्रेनमध्ये गाणे गायले. यानंतर आयुष्मानने सलग अनेक दिवस ट्रेनमध्ये गाणी गायली आणि पैसे मिळवू लागले.