‘पुष्पा’ मधील गाण्यावर ऑस्ट्रेलियन क्रिकेटर वॉर्नरचा डान्स! डान्स पाहून अल्लू अर्जुन म्हणाला…

सध्या सगळीकडेच अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा- द राईज’ या चित्रपटाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. चित्रपटही अल्लू अर्जुनच्या लूक पासून चित्रपटातील गाण्यांपर्यंत सगळंच सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहे. देशभरातल्या मुली या चित्रपटातील ‘सामी सामी’ गाण्याच्या अवघड स्टेप्स वर नाचताना दिसत आहेत, तर देशातली मुलं या चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ या गाण्यातील साध्या पण अल्लू अर्जुनमुळे आकर्षक झालेल्या स्टेप वर थिरकताना दिसत आहेत. याला सेलिब्रेटीही अपवाद नाहीत. अनेक सेलिब्रेटींनाही सध्या ‘पुष्पा फिवर’ चढल्याचे दिसून येत आहे.

आश्चर्य म्हणजे हे सेलिब्रेटी केवळ भारतातील नाहीत, तर जगभरातील आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडिया वर धुमाकूळ घालताना दिसत आहे. हा व्हिडिओ आहे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरचा. डेव्हिड वॉर्नरचे भारत प्रेम तर जगजाहीर आहे. तो वारंवार सोशल मीडिया वरून आपले हे भारत प्रेम जाहीर करताना दिसत असतो. आता देखील त्याने अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा- द राईज’ चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाण्यातील प्रसिद्ध स्टेप करत हा व्हिडिओ सोशल मीडिया वर शेअर केला आहे. त्यावर त्याने “पुष्पा, व्हॉटस् नेक्स्ट?” अशी कॅप्शन देखील दिली आहे.

या व्हिडिओ मध्ये वॉर्नरने ब्लॅक अँड व्हाईट शर्ट आणि ब्लॅक जीन्स परिधान केली आहे. वॉर्नरने ‘श्रीवल्ली’ मधील स्टेप करत चाहत्यांची वाहवा मिळवली आहे. इतकेच नाही, तर चक्क अभिनेता अल्लू अर्जुनने या व्हिडिओ वर कमेंट करत स्माईली आणि फायर इमोजी पोस्ट केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरच्या या व्हिडिओ वर भारतीय चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडलेला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by David Warner (@davidwarner31)

इतकेच नाही, तर वॉर्नरच्या तिन्ही मुलींनी ‘सामी सामी’ गाण्यावर डान्स करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. याचा व्हिडिओ देखील वॉर्नरने पोस्ट केला आहे. याला कॅप्शन देत वॉर्नरने सांगितले, की “आई-बाबांच्या आधी मुलींना सामी सामी गाण्यावर डान्स करून बघायचा होता.” या व्हिडिओ वरही अल्लू अर्जुनने कमेंट करत “सो क्यूट” अशी दाद दिली आहे.

विशेष म्हणजे वॉर्नरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर ‘पुष्पा’ चित्रपटाचे काही मीम्स देखील शेअर केले आहेत. काही मीम्स मध्ये चक्क अल्लू अर्जुनच्या चेहऱ्याच्या जागी वॉर्नरचा फोटो लावण्यात आला आहे. हे मीम्स खूपच विनोदी झाले आहेत. मात्र यावरून वॉर्नरला भारताबद्दल आणि भारतीय चित्रपटांबद्दल किती प्रेम आहे हे दिसून येत आहे.