‘हा’ मराठी अभिनेता बनला बाबा! आपल्या बाळाबद्दल व्यक्त केल्या या अपेक्षा…

मराठी चित्रपटसृष्टीत यंदा अनेक लग्नं पार पडली. मात्र याचबरोबर अजूनही काही आनंदाच्या गोष्टी मराठी कलाकारांच्या घरात घडल्या आहेत. त्या म्हणजे या कलाकारांच्या घरी छोट्या पाहुण्यांचे आगमन. अनेक कलाकारांनी यावर्षी आपल्या घरी छोट्या पाहुण्याचे स्वागत केले आहे. या छोट्या पाहुण्यांच्या आगमनाने या कलाकारांच्या घरी अगदी आनंदी आनंद झालेला पाहायला मिळाला.

असाच आनंद सध्या अनुभवत आहे मराठी चित्रपटसृष्टीतील एक स्टार कपल. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी डोहाळजेवणाचे फोटो सोशल मीडिया वर शेअर केले होते. आता त्यांनी आपण आई-बाबा झाल्याची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. अभिनेता अंकित मोहन आणि अभिनेत्री रुची सवर्ण या स्टार कपलने आपण आई-बाबा झाल्याची बातमी सोशल मीडिया वरून शेअर केली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankit Mohan (@ankittmohan)

अंकित आणि रुची यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. आपल्या बाळाचा एक गोड अनुभव नुकताच अंकितने सांगितला. रुची दोन दिवसांपूर्वी दवाखान्यात ऍडमिट झाली. त्यावेळी डिलिव्हरी नॉर्मल होईल अशी अंकितची अपेक्षा होती. मात्र काही कारणांमुळे सिझेरियन करावे लागले. आता अंकित आपल्या बाळाची काळजी घेत आहे. आपल्या लहानग्या बाळाला आपल्या हातात घेणं, त्याला आपल्या हाताने खाऊ घालणं, त्याची नॅपी बदलणं या सगळ्याचा अनुभव सध्या अंकित घेत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankit Mohan (@ankittmohan)

आपल्या मुलाच्या आगमनाने अंकितला झालेला आनंद त्याच्या शब्दांत ओसंडून वाहताना दिसतो. आपल्या मुलाच्या भविष्याबद्दल त्याच्या काही अपेक्षा आहेत. त्या सांगताना तो म्हणाला, की माझा मुलगा आता हळूहळू रांगेल, चालू लागेल आणि पुढे जाऊन तो माझा जिम पार्टनर देखील बनेल. या विचारानेच अंकित खूप खूष झालेला पाहायला मिळाला. २०१५ मध्ये रुची आणि अंकितने लग्न केले होते. आता २०२१ मध्ये दोघे आई-बाबा झाले आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankit Mohan (@ankittmohan)

अंकितचा येत्या ३१ डिसेंबरला ‘पावनखिंड’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी अंकित खूप उत्सुक आहे. या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार सुरू आहे. अंकितने या आधीही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. रुची सवर्णने देखील मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. आता दोघेही खऱ्या आयुष्यात आई-बाबाच्या भूमिकेत शिरलेले पाहायला मिळणार आहेत. दोघेही आपल्या बाळाची चांगली काळजी घेतील आणि त्याला एक चांगले आयुष्य देतील, यात काही शंकाच नाही. अंकित आणि रुचीला त्यांच्या या नव्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!