‘तारक मेहता का…’ मधील बबिताजींनी घेतले नवीन घर! मुंबई मध्ये आहे हे आलिशान घर…

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका प्रेक्षकांची अजूनही लाडकी मालिका आहे. मालिकेतील व्यक्तिरेखाही मालिकेइतक्याच लोकप्रिय आहेत. यातीलच एक व्यक्तिरेखा म्हणजे बबिताजी. गोकुलधाम सोसायटीच्या रहिवासी, पत्रकार पोपटलालची शेजारीण आणि अय्यरची पत्नी असलेली बबिता गोकुलधाम सोसायटीतील एक सुंदर महिला. जेठालालला ती जितकी आवडते, तेवढीच ती प्रेक्षकांनाही आवडते. ही भूमिका साकारली आहे मुनमुन दत्ता या अभिनेत्रीने.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 𝐌𝐔𝐍𝐌𝐔𝐍 𝐃𝐔𝐓𝐓𝐀 🧚🏻‍♀️🦋 (@mmoonstar)

यंदाची दिवाळी बबिताजी म्हणजेच मुनमुन साठी खूपच विशेष ठरली. त्याला कारणही तसेच घडले. यंदाची दिवाळी मुनमुनने आपल्या स्वतःच्या घरात साजरी केली आहे. या वर्षी मुनमुनने आपलं नवं घर विकत घेतलं. तिचे हे नवीन घर खूपच आलिशान आहे. सोशल मीडिया वर तिने आपल्या घराचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या दिवाळी लूक मधील फोटोंमध्ये तिच्या घराची झलक पाहायला मिळते.

आपल्या पिवळ्या आणि गुलाबी रंगाच्या लेहंग्यात मुनमुन खूप गोड दिसत आहे. आधीच सुंदर असलेल्या मुनमुनच्या रूपाला या दिवाळी लेहंग्यामुळे चार चाँद लागलेले पाहायला मिळतात. तिने यावर मॅचिंग बांगड्या घातल्या आहेत आणि मोकळे सोडलेले केस तिला खूप शोभून दिसत आहेत. आपल्या या फोटोंबरोबर तिने आपल्या नवीन घराचे फोटो शेअर केले आहेत. ‘नवीन घर, नवीन सुरुवात’ अशी कॅप्शन तिने दिली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 𝐌𝐔𝐍𝐌𝐔𝐍 𝐃𝐔𝐓𝐓𝐀 🧚🏻‍♀️🦋 (@mmoonstar)

आपल्या धावपळीच्या शेड्युल मधून तिने या घराचे शिफ्टिंग करण्यासाठी वेळ काढला होता. या दरम्यान ती खूप आजारी देखील पडली होती. सोशल मीडिया पासून थोडं लांब होऊन आपली आई आणि जवळच्या लोकांबरोबर या वर्षीची दिवाळी तिने साजरी केली. तिची तब्येत काही काळापूर्वी बरी नसली तरी ती आता त्यातून बरी झाली असल्याचे तिने सांगितले. तसेच हे घर म्हणजे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे, असेही ती आपल्या पोस्टमध्ये म्हणते.

या क्षेत्राची कोणतीच माहिती नसताना, कोणीच पाठीशी नसताना तिने या क्षेत्रात आज स्वतःच्या बळावर नाव कमावले आहे. याबद्दल तिला स्वतःचा अभिमान वाटतो, असेही ती आपल्या पोस्टमध्ये म्हणते.आपल्या या नव्या घरात नवं आयुष्य सुरू करण्यासाठी ती खूप उत्सुक असलयाचे तिच्या पोस्टमधून कळते. आपल्या या नव्या घराबद्दल सांगताना तिने सगळ्यांची दिवाळी नीट गेली असेल अशी आशा व्यक्त केली. तुम्हाला बबिताजींचे हे नवे घर कसे वाटले, ते आम्हाला जरूर कळवा.