बाळूमामाच्या नावानं चांगभलं यातील मुख्य अभिनेता पडला या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात..?

खूप साऱ्या अशा मालिका आहेत या आज देखत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत त्यापैकी एक म्हणजेच कलर्स मराठी वाहिनीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं ही मालिका तीन वर्ष झाली प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. बाळुमामा च्या जीवनावर दाखवलेली ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे. बाळुमामाची भूमिका साकारणारा अभिनेता सुमित पुसावळे हा होय. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की प्रमुख नायक म्हणून अभिनेता सुमित पुसावळे यांची बाळूमामा ही पहिलीच मालिका आहे. या मालिका अगोदर झी मराठी वाहिनीवरून सुमित पुसावळे यांनी लागीर झालं जी या मालिकेद्वारे पदार्पण केले होते.

अभिनेता सुमित पुसावळे हा मूळचा दिघंजीचा आहे. शालेय शिक्षण घेतल्यानंतर सुमित पुण्यात आला. पुण्यात आल्यानंतर त्याने हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रात पदवी मिळवली आणि त्यात काही वर्ष नोकरी सुध्दा केली. त्याला स्वतःचे रेस्टॉरंट उभा करायचे होते. लहानपणापासूनच सुमित शालेय आणि महाविद्यालयीन काळात सांस्कृतिक कार्यक्रमात आवडीने सहभागी व्हायचा इथूनच त्याला कलेची आवड निर्माण झाली. मग त्याला मुंबईला गेल्यानंतर एका फिल्मसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. याचबरोबर सरगम या चित्रपटातून तो झळकला होता.

यानंतर मग सुमित पुसावळे ‘लागीर झालं जी, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेमधून लाईमलाईटमध्ये आला. नुकताच सुमित पुसावळे यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर नवीन वर्षाच्या प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत याच बरोबर त्यांनी आपल्या मैत्रिणीसोबत एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोवरून प्रेक्षक म्हणताहेत की सुमित प्रेमात पडला की काय..? तर त्या फोटोत दिसणारी सुमित ची मैत्रीण आहे दिशा परदेशी.

View this post on Instagram

A post shared by Sumeet Pusavale_official (@sumeet_pusavale)

दिशा परदेशी देखील एक मराठी अभिनेत्री आहे. २०१६ साली इंडियन हेअर अँड ब्युटी या सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्टार प्रवाह वरील मालिका ‘स्वाभीमान शोध अस्तित्वाचा’ या मालिकेत दिशा परदेशी यांनी निहारिकाचे पात्र साकारले होते. या मालिकेद्वारे आणि मॉडलिंग द्वारे दिशा परदेशी यांनी या क्षेत्रात प्रवेश घेतला.