दिव्यांग परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांनी दिली नाही साथ, परंतु अशा कठीण परिस्थितीत पहिल्या प्रयत्नातच बनली IAS अधिकारी..

आपल्या जीवनामध्ये दररोज चढ -उतार येत असतात, कधी सुख असते तर कधी दु: ख असते, पण असे म्हटले जाते की कोणतेही काम पूर्ण मनापासून केले तर ते काम नक्कीच पूर्ण होते. असेच काम राजस्थानच्या “उमूल खेर” ने करून दाखवले आहे.

उमूल खेरचे लहानपणापासूनच IAS बनण्याचे स्वप्न होते, एका साध्या कुटुंबातील उमूलला आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागले, पण उमूलने कधीही हार मानली नाही आणि आपल्या मेहनतीच्या जोरावरती आयएएस बनण्याचा निर्णय घेतला.

उमूलला बौन डिसऑर्डरचा आजार असल्याने तिची हाडे कमकुवत होती. ज्यामुळे उमूलचे २८ वर्षांच्या वयापर्यंत १५ वेळा हाड मोडले आहे.

उमूलचे संपूर्ण कुटुंब लहानपणापासूनच आर्थिक संकटात जगत होते. उम्मूलचे संपूर्ण कुटुंब निजामुद्दीनमध्ये राहत होते, परंतु २००१ मध्ये फुटपाथ झोपडपट्ट्या पाडल्यानंतर त्यांचे कुटुंब त्रिलोकपुरीला गेले आणि तेथे राहू लागले.

कमी वयाचीच असताना उमूलने आईचे छत्र हरवले. त्यात भर म्हणून तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले, उमूलशी तिच्या सावत्र आईचे चांगले वागणे नव्हते. त्यामुळे रोज भांडणेही होत असत.

IAS होण्यासाठी उमूल नेहमीच अभ्यासात मग्न असायची, पण तिची सावत्र आई तिच्या अभ्यासाच्या विरोधात होती. हे वाचून काय होणार आहे घरामधील काम बघ असे तिचे म्हणणे होते. नंतर काही दिवसांनी उममूलने खोली भाड्याने घेतली आणि तिथे राहायला सुरुवात केली.

उमूल अभ्यास आणि इतर खर्च कोचिंग शिकवून भागवायची. उमूल आयएएस बनण्याचा निर्धार करत होता, त्यासाठी तिने तयारी सुरू ठेवली. यादरम्यान तिने खूप मेहनत केली आणि पहिल्याच वेळी ४२० गुण मिळवून आयएएस बनली.

दिव्यांग असून हि आयएएस बनणे आजच्या पिढीसाठी प्रेरणास्त्रोत आहे. तिने बऱ्याच अडचणीनंतरही आपली स्वप्ने सत्यात उतरविली.