अंगूरी भाभीपासून तिवारी जी पर्यंत, ‘भाभीजी घर पर हैं’ मधील हे कलाकार एक एपिसोड साठी आकारतात इतकी फीस..जाणून डोळे पांढरे कराल..

आजकाल अनेक लोकांना टीव्ही मालिका बघायला आवडू लागली आहे. तसे तर टीव्हीवर बरेच लोकप्रिय कार्यक्रम आहेत, जे वर्षानुवर्षे लोकांचे मनोरंजन करत आले आहेत. त्याच लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये एक म्हणजे “भाबी जी घर पर हैं”. या हिंदी शो ला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे. हा कार्यक्रम पाहणे बहुतेक प्रेक्षकांना आवडतो.

या शोच्या लोकप्रियतेचा आपण अंदाज हि लावू शकत नाही. या शो मधील सर्व कलाकार आपल्या पात्रांच्या नावानेच ओळखतात. सर्व पात्र लोकांचे भरपूर मनोरंजन करताना दिसतात. या शोमध्ये सर्व स्टार्सनी आपापल्या भूमिका चांगल्या प्रकारे निभावल्या आहेत. परंतु आपणास हे माहित आहे का ? हसवून लोटपोट करणारे हे कलाकार या शो साठी किती फीस घेतात. आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे हे कलाकार शो मधून किती पैसे कमवतात याबद्दल माहिती देणार आहोत.

शुभांगी अत्रे
भाभी जी घर पर हैं’ या सुपरहिट मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली शुभांगी अत्रे म्हणजे अंगुरी भाभी यांचे इंग्रजी ऐकून प्रेक्षक खूप हसले. परंतु गुरी भाभीसारख्या रंजक भूमिकेत असलेली शुभांगी अत्रे प्रति एपिसोड सुमारे ४०००० हजार रुपये घेते.

रोहिताश गौर
या शोमध्ये रोहिताश गौर म्हणजे तिवारी जी अंगुरी भाभीच्या पतीच्या भुमीकेत आहे. तो प्रेमाने पत्नी अंगुरीला पागलिया म्हणून संबोधतो. तिवारी जी यांची शैली प्रेक्षकांना खूपच आवडते. रोहिताश गौर अर्थात तिवारी जी प्रति भाग सुमारे ६० हजार रुपये घेतात.

सौम्या टंडन
शोमध्ये सौम्या टंडनने अनिता भाभीची भूमिका साकारली आहे. तिचे पात्र प्रेक्षकांना खूप आवडते. शोच्या आत, सौम्या टंडनला केवळ अनिता भाभीच नव्हे तर गोरी मेम म्हणून हि संबोधले जाते. सौम्या टंडन प्रत्येक एपिसोडसाठी अंदाजे 60 हजार रुपये घेते.

आसिफ शेख
आसिफ शेख यांनी “भाबी जी घर पर है” मध्ये विभूती नारायण मिश्राची भूमिका केली होती. तो एक आश्चर्यकारक अभिनेता आहे. शोमध्ये तो अंगुरी भाभीबरोबर फ्लर्ट करताना दिसत आहे. त्याची शैली प्रेक्षकांना खूप आवडली आहे. आपण सांगू की आसिफ शेख एक एपिसोड साठी ७० हजार रुपये घेतात.

हप्पू सिंह
या शोमध्ये दारोगा हप्पू सिंगची व्यक्तिरेखा लोकांना खूपच आवडली आहे. या शोमध्ये योगेश त्रिपाठी हप्पू सिंगची व्यक्तिरेखा साकारत आहेत. योगेश त्रिपाठी त्याच्या पात्रासाठी ३५ हजार प्रति भाग फीस आकारतात.

रजनी
या शोमध्ये हॉट अभिनेत्री फाल्गुनी रजनीची भूमिका साकारत आहे. तिच्या या छोट्या छोट्या पात्रासाठी ती २० हजार फीस घेते.