‘भूतनाथ’ मधला बंकू आठवतोय का? आता दिसतो असा,आणि करतो हे काम..जाणून विश्वास बसणार नाही

या शतकातील महानायक, बॉलीवूडचे शहनशाह म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते म्हणजे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) बच्चन साहेबांचे खूप छान छान सिनेमे आहेत. त्यांच्या दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी खूप वैविध्यपूर्ण भूमिका केल्या आहेत. असाच एक वेगळी भूमिका असलेला व गाजलेला सिनेमा म्हणजे ‘भूतनाथ’ (Bhootnath).

विवेक शर्मा यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. २००८ मध्ये आलेल्या या सिनेमात शाहरुख खान, जुही चावला, राजपाल यादव या तगड्या कलाकारांच्या भूमिका होत्या. आणि या सर्वांमध्ये जो भाव खाऊन गेला, ज्याने बच्चन यांच्या समोर न डगमगता मस्त काम केलं, तो होता छोटा ‘बंकू’.

हे नाव आहे या छोट्या कलाकाराचं..
ही बंकूची भूमिका करणाऱ्या कलाकाराचे नाव आहे, अमन सिद्दीकी (Aman Siddiqui), त्याच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. प्रेक्षकांनाही ही भूमिका खूपच आवडली होती. आता या सिनेमाला १३ वर्षे झाली आहेत. आणि अमनही बराच मोठा झाला आहे. तो आता एक रुबाबदार आणि स्मार्ट तरुण दिसतो.

अमनने लहानपणातच सिने क्षेत्रात पदार्पण केले होते. आणि त्याला त्या वयातच प्रसिद्धीचं ते वलय प्राप्त झालं होतं. आता तो सिनेक्षेत्राशीही निगडीत राहिलेला नाही.

आता अमन काय करतो?
भूतनाथ नंतर अमनला बऱ्याच चित्रपटांसाठी विचारणा होऊ लागली. पण त्याने या पेक्षा आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं आहे. २०१३ मध्ये आलेल्या ‘शिवालिका’ या सिनेमानंतर आजवर त्याने कोणताच सिनेमा केला नाही. अमन शाळेत एक हुशार विद्यार्थी होता. त्याला दहावीत ९०% गुण मिळाले आहेत.

सध्या अमन गाणं शिकतो आहे. गिटारच्या साथीने तो आपल्या गाण्याचे बहारदार व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत असतो. त्याला आता गायक बनायची इच्छा आहे. शिक्षण संपलं की तो त्या प्रकारे प्रयत्नही करणार आहे. आणि भविष्यात त्याला सिनेमा ऑफर्स आल्या तर तो त्यामध्येही काम करणार असल्याचं त्यानं एका मुलाखतीत सांगितलं आहे. या गायक अभिनेता होऊ इच्छिणाऱ्या अमनला स्मार्ट मराठी कडून शुभेच्छा..

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.