भुवनेश्वरची पत्नी आहे फारच सुंदर! चक्क केले पतीचे अकाऊंट हॅ’क…

क्रिकेटर भुवनेश्वर कुमारचा मैदानावरचा खेळ जरी जगजाहीर असला तरी त्याचं वैयक्तिक आयुष्य हे प्रसार माध्यमांपासून त्याने बरंचसं दूरच ठेवलं आहे. भुवीच्या पत्नीबद्दल फारच कमी जणांना माहिती आहे. २०१७ मध्ये त्याचा विवाह नुपूर नागर बरोबर झाला. नुपूर एक इंजिनियर आहे. सुरुवातीला ती दिल्लीमध्ये एका कंपनीत नोकरी करायची. नुपूर आणि भुवनेश्वर शेजारी शेजारी रहात होते आणि त्यासोबतच दोघांमध्ये चांगली मैत्री होती.

दोघांचेही वडील पो’लीस खात्यात होते. त्यामुळे दोघेही एकाच कॉलनीत लहानाचे मोठे झालेले. नुपूर ला क्रिकेटची विशेष आवड नाही. मात्र ती आपल्या पतीला नेहमी प्रोत्साहन देत असते. नुपूर दिसायला खूपच सुंदर आहे. भुवनेश्वर आणि नुपूर ची जोडी खूपच छान दिसते. भुवनेश्वर आणि नुपूर दोघेही क्रिकेटर्स मधील क्यूट कपल म्हणून ओळखले जातात.

एकदा भुवनेश्वरने या दोघांमधला एक गमतीदार किस्सा शेअर केला होता. एकदा अचानक भुवनेश्वरने आपले ट्विटर अकाऊंट ओपन केले. त्याच्या अशा अचानक वागण्याचा कुणालाच काही उलगडा होत नव्हता. त्यामुळे त्याला याबाबत विचारले असता त्याने त्यामागची मजेशीर कहाणी सांगितली. त्याने हे ट्विटर अकाऊंट आपली बायको नुपूर मुळे सुरू केले होते.

त्याचे झाले असे, की नुपूरने लग्नानंतर एकदा भुवनेश्वर कडे त्याच्या फेसबुक अकाऊंटचा पा’स’व’र्ड मागितला होता. भुवनेश्वरने त्या वेळी काहीतरी डायलॉग मारत वेळ मारून नेली. त्याला वाटले की हे प्रकरण इथेच थांबेल. भुवीने आपल्या पत्नीला समजावले की नात्यात आपण एकमेकांना स्पेस देणे खूप गरजेचे आहे. त्यावर नुपूरनेही त्याला सहमती दर्शवली. त्यापुढे जे झाले, त्याने मात्र भुवीने लगेच आपले ट्विटर अकाऊंट ओपन करायचा निर्णय घेतला.

हे पासवर्ड प्रकरण आदल्या दिवशी संपले आहे असे वाटत असताना नुपूरने दुसऱ्या दिवशी भुवीला आश्चर्याचा ध’क्का दिला. ती त्याच्याकडे येऊन म्हणाली, “हा बघ तुझा पासवर्ड.” तिने चक्क आपल्याच नवऱ्याचे फे’स’बु’क अ’का’ऊं’ट हॅ’क केले होते! त्यामुळे भुवीला तातडीने ट्विटर अकाऊंट काढावे लागले होते. नवरा-बायकोच्या नात्यात अशा गमती जमती होतच राहतात.

सर्वसामान्यांसारखंच क्रिकेटर्सही आयुष्यातल्या अशा साध्या साध्या गोष्टींना सामोरे जात असतात. अशा आंबट-गोड गोष्टीच सुखी संसाराचं रहस्य आहे. काय मग मंडळी, तुमच्या सुखी संसाराचं रहस्य काय आहे? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.