बिग बॉस १५ अपडेट: अभिजीत बिचकुलेनं ओलांडल्या सर्व मर्यादा! देवोलिनाकडे मागितला कि’स…

‘बिग बॉस १५’ हा बहुचर्चित रिऍलिटी शो आता शेवटाकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे प्रेक्षक आणि स्पर्धक दोघांमध्येही भरभरून उत्साह संचारलेला दिसत आहे. ‘टिकेट टू फिनाले’ जाहीर झाल्यापासून तर स्पर्धकांचा उत्साह आणि प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचले आहेत. साहजिकच ‘टिकेट टू फिनाले’ जिंकण्यासाठी प्रत्येक स्पर्धक आपल्या परीने प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र काही स्पर्धक अतिउत्साही झालेलेही पाहायला मिळत आहेत.

या अतिउत्साहाच्या भरात आपण काय करतो आहोत, याचेही भान या स्पर्धकांना उरलेले दिसत नाहीये. अशातलाच एक स्पर्धक आहे अभिजीत बिचकुले. ‘बिग बॉस मराठी’ मध्येही त्याने प्रचंड राडा केला होता. आता ‘बिग बॉस १५’ मध्येही तो असाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. यावेळी तर त्याने सज्जनतेच्या सर्व मर्यादा ओलांडत जोरदार राडा केल्याचे चित्र आहे.

अभिजीत बिचकुलेनं चक्क देवोलिना भट्टाचार्जीकडे किस मागितला. यानंतर बिग बॉसच्या घरात बराच राडा झालेला पाहायला मिळाला. याचा एक प्रोमो सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना वस्तुसंग्रहालयातील वस्तू चोरण्याचा टास्क देण्यात आला होता. यादरम्यान बिचकुलेनं बऱ्याच वस्तू चोरल्या. त्याने देवोलिनाला सांगितले, की त्याच्याकडे खूप वस्तू आहेत. मात्र एवढ्यावरच न थांबता त्याने चक्क देवोलिनाच्या गालांना स्पर्श करत ‘तेरे लिए कुछ भी करूंगा लेकिन पप्पी चाहिए’ असं म्हटलं.

यावर संतप्त झालेल्या देवोलिनाने बिचकुलेवर आवाज चढवत बरंच भांडण केलं. माझ्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नको, मर्यादा ओलांडू नको असं म्हणत देवोलिनाने त्याला खूप सुनावलं आहे. देवोलिना बिचकुलेवर अशी बरसलेली पाहून बिचकुलेनं तो मस्करी करत होता, असं सांगितलं. मात्र यावर त्याचं कोणीही काहीही ऐकून घेतलं नाही. तेजस्वी प्रकाश आणि प्रतीक सहजपाल देवोलिनाच्या बाजूने उभे राहिलेले पाहायला मिळाले.

दरम्यान तेजस्वीने देवोलिनाला ‘अभिजीत बिचकुले तुला ब्लॅकमेल करत होता का?’ असं विचारलं. त्यावर ‘हो’ असं उत्तर देताना देवोलिनाला अश्रू अनावर झाले. ते पाहून आणि ऐकून तेजस्वीचा पारा अजून चढला. यानंतर तेजस्वी आणि बिचकुले मध्ये वादावादी झालेली पाहायला मिळाली.

आता यावरून ‘विकेंड का वार’ मध्ये बिचकुलेला काय काय ऐकून घ्यावं लागणार आहे ते कळेलच. बिचकुलेने याआधीही बिग बॉसचे घर जाळण्याची धमकी देत सगळ्यांना टेन्शन मध्ये आणलं होतं.