बिग बॉस १५ अपडेट: तेजस्वी प्रकाश ठरली विजेती! प्रतीक सहजपालला उपविजेतेपद…

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस १५’ हा कार्यक्रम बराच चर्चेत राहिला आहे. अखेर १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर या कार्यक्रमाची शनिवार आणि रविवार अशा दोन भागांत मिळून सांगता करण्यात आली आणि अखेर या पर्वाच्या विजेत्याचे नाव जाहीर झाले. दोन्ही दिवस कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला होता. या दोन्ही दिवशी या कार्यक्रमाच्या आधीच्या पर्वांचे विजेते श्वेता तिवारी, गौहर खान, रुबिना दिलेक, गौतम गुलाटी, उर्वशी ढोलकीया यांनी हजेरी लावत कार्यक्रमाला चार चाँद लावलेले पाहायला मिळाले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

शहनाज गिलने विशेष उपस्थिती लावत ‘बिग बॉस १३’ चा विजेता सिद्धार्थ शुक्लाला आपल्या परफॉर्मन्समधून श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमाला ‘गहराईयाँ’ या चित्रपटाच्या कलाकारांनीही हजेरी लावलेली पाहायला मिळाली. दीपिका पदुकोण, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि धैर्य कारवा असे कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित होते. स्पर्धकांनीही या ग्रँड फिनाले मध्ये धमाकेदार परफॉर्मन्स सादर केलेले पाहायला मिळाले.

अखेर या कार्यक्रमाचा होस्ट अभिनेता सलमान खानने ‘बिग बॉस १५’ च्या विजेत्याचे नाव जाहीर केले. ‘बिग बॉस १५’ ची विजेती ठरली आहे तेजस्वी प्रकाश. तेजस्वीला बिग बॉसच्या ट्रॉफीसह ४० लाख रुपयांची रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे. तसेच तिला ‘नागीण ६’ या नव्या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी देखील मिळाली आहे. या पर्वाचा उपविजेता ठरला आहे प्रतीक सहजपाल. तर सेकंड रनर अप ठरला करण कुंद्रा.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

या पर्वाच्या उत्तरार्धात शमिता शेट्टी, प्रतीक सहजपाल, रश्मी देसाई, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, निशांत भट हे सहा स्पर्धक शिल्लक राहिले होते. यापैकी शनिवारच्या ग्रँड फिनालेच्या पहिल्या भागात रश्मी देसाई बिग बॉसच्या घरातून बाहेर गेली. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी शमिता शेट्टी बाहेर गेली, तर निशांत भटने १० लाख रुपयांची रोख रक्कम घेत कार्यक्रमातून बाहेर जाणे पसंत केले. अखेर करण कुंद्रा आणि प्रतीक सहजपाल यांना मात देत तेजस्वी प्रकाश या पर्वाची विजेती ठरली आहे.

‘बिग बॉस १५’ हा कार्यक्रम सुरू असताना शमिता शेट्टीच या पर्वाची विजेती ठरेल असे बऱ्याच जणांना वाटले होते. त्यामुळे ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. शमिता शेट्टी आणि प्रतीक सहजपाल यांच्यात विजेतेपदासाठी चुरस असेल असे चित्र पहिल्यांदा दिसत होते. मात्र तेजस्वीनेही नेहमी ‘हम किसीसे कम नहीं’ म्हणत आपली मक्तेदारी दाखवून दिली. तेजस्वी प्रकाश वर सध्या सगळीकडून शुभेच्छांचा पाऊस पडत आहे.