‘हा’ बॉलिवूड अभिनेता आहे अब्जाधीश व्यावसायिक! मात्र त्याची पत्नी राहते अत्यंत साधेपणाने…

काही बॉलिवूड अभिनेत्यांच्या पत्नी देखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. मात्र अनेक अभिनेते असे आहेत ज्यांच्या पत्नी कला क्षेत्राशी निगडीत नाहीत. अशा अभिनेत्यांच्या बायकांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसते. कारण बऱ्याच वेळा त्या या क्षेत्राशी निगडीत नसल्याने लाइमलाईट पासून लांब राहणेच पसंत करतात. काही अभिनेत्यांच्या पत्नी मात्र या क्षेत्राशी निगडीत नसल्या तरी कायम लाइमलाईट मध्ये राहताना दिसतात. मात्र बऱ्याच अभिनेत्यांच्या पत्नी मात्र या झगमगाटापासून लांब राहणेच पसंत करतात.

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयची पत्नी देखील अशीच आहे. ती सहसा प्रसार माध्यमांपासून लांब असते. अभिनेता विवेक ओबेरॉयने कंपनी, दम, मस्ती, युवा, ओमकारा, शूटआऊट ऍट लोखंडवाला, साथिया, प्रिन्स अशा हिंदी चित्रपटांमध्ये काम करत आपला असा वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही विवेकने नाव कमावले आहे. सध्या विवेक जरी हिंदी चित्रपटांमध्ये कमी दिसत असला तरी तो अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे. त्यामुळे त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

अभिनयाबरोबरच विवेकने काही इंग्रजी चित्रपटांच्या हिंदी व्हर्जनसाठी आपला आवाज दिला आहे. याशिवाय विवेक एक यशस्वी व्यावसायिक देखील आहे. त्याची ‘कर्म इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ नावाची कंपनी आहे. आपल्या या कंपनीद्वारे तो दरवर्षी अब्जावधी रुपये कमावतो. तसेच आपल्या कंपनीच्या नफ्यातील काही भाग तो बऱ्याचदा सामाजिक कार्यासाठीही देताना दिसतो.

विवेकने २९ ऑक्टोबर २०१० मध्ये प्रियांका अल्वा सोबत लग्नगाठ बांधली. प्रियांका कर्नाटकचे मंत्री जीवराज अल्वा यांची मुलगी आहे. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्ये आहेत. विवेक सगळे सण आपल्या कुटुंबासोबत साजरे करतो. त्याचे फोटो तो सोशल मीडिया वर शेअर करत असतो. या फोटोंमधील त्याच्या घराची जेवढी चर्चा होते, तेवढीच चर्चा त्याच्या पत्नीची देखील होत असते.

विवेकची पत्नी प्रियांका अत्यंत साधेपणाने राहते. या फोटोंमधून तिचा साधेपणा दिसून येत असतो, नेटकरी नेहमीच तिचे या साधेपणासाठी कौतुक करताना दिसतात. एका मंत्र्याची मुलगी आणि व्यावसायिकाची पत्नी असूनही प्रियांका लाइमलाईट पासून लांब राहणेच पसंत करते. एवढी संपत्ती असूनही प्रियांका कायम अत्यंत साध्या आणि नीटनेटक्या पोशाखात दिसत असते. नेटकऱ्यांना तिच्या या साधेपणाचे फार कौतुक आहे. कोणत्याही झगमगाटाशिवाय प्रियांका आपली शांत आणि साधी जीवनशैली जगताना दिसते.