कोट्यावधी मालामातेचे मालक असून हि हे बॉलिवूड स्टार राहतात चक्क भाड्याच्या घरात, कारण जाणून धक्का बसेल..

जर एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री बॉलिवूडमध्ये चांगले चित्रपट देत असेल तर त्याचे मुंबई मध्ये आलिशान घर असेल लोकांना वाटत असेल. परंतु आपला हा गैरसमज दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला त्या अभिनेते व अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत जे अजूनही मुंबईत भाड्याच्या घरात राहत आहेत.

हृतिक रोशन:
बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हणून ओळखल्या जाणार्‍या अभिनेता हृतिक रोशनने अनेक भू संपत्ती प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे. यानंतरही अभिनेताने जुहूमध्ये भाड्याने घेतलेल्या अपार्टमेंटमध्ये राहण्याचे निवडले आहे. क्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाच्या बंगल्याच्या अगदी जवळ आहे. अभिनेता जवळपास एक वर्षापासून तेथे राहत आहे. एका वेबसाईट अहवालानुसार हृतिक दरमहा ८.२५ लाख घर भाडे म्हणून देत आहे.

जॅकलिन फर्नांडिज:
श्रीलंकन ब्यूटी आणि माजी मिस युनिव्हर्स श्रीलंका जॅकलिन फर्नांडिज सध्या सी-फेसच्या पाच बेडरूमच्या अपार्टमेंटमध्ये राहत आहेत. जी बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनासकडून लीजवर घेण्यात आली आहे. त्यासाठी जॅकलिन सध्या दरमहा ६.७८ लाख रुपये भाडे मोजत आहे.

कतरिना कैफ:
ज्या दिवशी कतरिना कैफने चित्रपट इंडस्ट्री मध्ये पाऊल ठेवले आहे त्या दिवसापासून तिच्याकडे घर नाही. कार्टर रोडवरील सिल्व्हर सँड्स अपार्टमेंटमध्ये राहण्यापासून वांद्रे येथील भाड्याने घेतलेल्या पेंटहाऊसपर्यंत कतरिना कैफ नेहमीच भाडेकरू म्हणून राहिली आहे. एका वेबसाइटनुसार कतरिना कैफ दरमहा १५ लाख रुपये भाड्याने देत आहे.

परिणीती:
परिणीतीने आपल्या बॉलीवूड करिअरची सुरुवात ‘लेडीज वर्सेज रिकी बहल’ या चित्रपटाद्वारे केली होती. परिणीती अजूनही तिच्या स्वप्नातील घर शोधत आहे, पण तिला शोधण्यासाठी तिला वेळ नाही. म्हणूनच ती अजून मुंबईतील २ बेडरूमच्या अपार्टमेंटमध्ये भाडेकरू आहे.

विद्युत जामवाल:
साऊथ मधील प्रसिद्ध अभिनेता विद्युत जामवालने २०१२ साली ‘फोर्स’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्याला ‘बॉलीवूडचा नवीन अ‍ॅक्शन हिरो म्हणून देखील ओळखले जाते. विद्युत जामवाल यांना मालमत्ता खरेदी करण्यासाठी पैसे गुंतवायचे नाहीत आणि म्हणून तो भाड्याच्या घरामध्ये सध्या राहत आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.