एकेकाळी करायचा अशी नोकरी, एका संधीमुळं बदललं नशीब, मिळवलं यश आणि आता झाला आहे मोठा अभिनेता..

सिनेमाच्या चंदेरी दुनियेत नाव, पैसा, प्रसिद्धी यांचं वलय असतं. हे कलाकार म्हणूनच सिने जगताचे तारे म्हणून ओळखले जातात. पण हे सगळं मिळवणं इतकं सहज सोपं नसतं. मोठं यश पदरी पडायच्या आधी खूप खस्ता खाव्या लागतात. अडचणींचा सामना करून नेटाने लढा द्यावा लागतो. बऱ्याच कलाकारांनी याच पद्धतीने मार्ग आक्रमत आपली कारकीर्द घडवली आहे. तर जाणून घेऊयात अशाच एका जबरदस्त अभिनेत्याबद्दल,

मुन्नाभाई एमबीबीएस (Munnabhai MBBS) हा सिनेमा आपण पाहिला आहे. संजू बाबा (Sanjay Dutt) गुं’ड असलेला मुनाभाई, अर्षद वारसीचा (Arshad Warsi) सर्किट, स्वतः आपल्या शेवटच्या चित्रपटात काम करणाऱ्या सुनील दत्त साहेबांचा बाप, या सगळ्यांच्या बरोबरीने ज्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही तो म्हणजे डॉ. जे. अस्थाना. म्हणजे सगळ्यांचा लाडका अभिनेता असलेला बोमन इराणी (Boman Irani).

बोमन इराणी यांचा जन्म २/११/१९५९ तत्कालीन बॉम्बे राज्यात झाला आहे. जन्माच्या आधीच त्यांचे वडील त्यांना सोडून गेले होते, त्यांच्या आईने सहाजिकच त्यांचे वडील आणि आई अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडल्या. बोमन यांचं शालेय शिक्षण झालं पुण्याच्या सेंट मॅरीज स्कूल मधून. शालेय वयात ते अतिशय सर्वसाधारण मुलांमध्ये म्हणजे थोडक्यात ढ म्हणून गणले जायचे. त्यांना ‘डिसलेक्सिआ’ नावाचा आजार होता, (हो तोच तो, तारे जमीन पर मधला) की ज्या मध्ये मुलांना अभ्यासात लवकर काहीच उमजत नाही, त्यांचा अक्षरांचा गोंधळ असतो.

त्यात बोमन हे लहानपणी बरेच अडखळत बोलायचे. या आजारावर त्यांनी उपचार घेतले आणि बरे झाले. बोमन यांना फोटोग्राफीची खूप आवड आहे. ते शालेय जीवनात जेंव्हा क्रिकेटचे सामने असायचे त्याची छायाचित्रे काढायचे. ज्याद्वारे त्यांचं अर्थार्जनही व्हायचं. नंतर त्यांनी मिठीबाई कॉलेज मधून वेटरिंगचं शिक्षण घेतलं. हे शिक्षण झाल्यावर त्यांनी नोकरी करायला सुरुवात केली. ताज महाल पॅलेस अँड टॉवर या हॉटेल मध्ये वेटर आणि रूम सर्व्हिसचं काम मिळालं, त्यांनी पुढे २ वर्षे हे काम केलं.

तरी अडचणी काही त्यांची पाठ सोडत नव्हत्या, त्या सारख्या समोर येत राहिल्या आणि ही वेटरची नोकरी त्यांना सोडावी लागली. त्यांनी आपल्या आईबरोबरच कामाला हातभार लावला. त्यांनी एक तपाहून जास्त आईसह त्यांनी घरचा व्यवसाय असलेल्या बेकरीमध्ये काम केलं. त्यांची आता पस्तिशी आली होती, पण समाजात अजूनही हवी तशी ओळख मिळाली नव्हती.

त्यांना सिनेमा पाहण्याची आवड आधी पासून होतीच. म्हणून जवळच्याच सिनेमागृहात सिनेमा पाहायला जात असत. असा एक कुणी तरी भेटतो ज्याच्यामुळे आपल्या आयुष्याला कलाटणी मिळते. बोमन यांची गाठ पडली ती प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक व प्रशिक्षक शामक दावर यांच्याशी. दावर यांनी बोमानना सल्ला दिला की त्यांनी रंगमंचावर आपलं नशीब आजमावून पहावं.

त्यांनी त्याप्रमाणं करायला सुरू केलं. आधी त्यांनी हंसराज सिद्दीकी यांच्याकडून अभिनयाचं घेतलेलं प्रशिक्षण इथे कामी आलं, त्यांचं आय ऍम नॉट अ बाजीराव हे नाटक खूप गाजलं. नंतर त्यांनी जाहिरातीत काम करायला सुरुवात केली. सिएट टायर, क्रॅक जॅक, अंबुजा सिमेंट, फेंटा अशा त्यांच्या जाहिराती प्रसिद्ध आहेत.
वयाच्या चाळीशी नन्तर चित्रपटक्षेत्रात त्यांचं पदार्पण झालं. त्यांचं काम पाहुन विधु विनोद चोप्रा यांच्या सारख्या रत्न पारख्याला कळलं होतं की बोमन खरंच अभिनय क्षेत्रातील रत्न आहे.

त्यांना ओळख मिळाली ती डॉ. अस्थाना या भूमिकेमुळं…. हा सिनेमा संजय दत्त , अर्षद वारसी यांच्यासह बोमन यांच्या आयुष्यालाही बदलणारा ठरला. यानंतर हनीमून ट्रॅवल्स प्रायवेट लिमिटेड, दोस्ताना, युवराज, थ्री इडियट्स, तीन पत्ती, हम तुम और घोस्ट, हाउसफुल, हाउसफुल 2,संजू असे सिनेमा केले आहेत. सिनेमांचं अर्धशतक केंव्हाच पूर्ण झालं आहे. आज बोमन इराणी म्हणजे कोणतीही भूमिका आणि सिनेमा गाजवणारा हुकमी एक्का आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.