ऐश्वर्याशी ब्रे’कअप नंतर एका मंत्र्याच्या मुलीसोबत लग्न..आता जगतोय सुखी जीवन विवेक..

आपण म्हणतो सवय, गुण, दोष, संपत्ती या बऱ्याच वेळा आपण म्हणतो की वारसा हक्काने मिळतात. कलेचंही तसंच आहे. कलाही वारसा हक्कानेच प्राप्त होते. संगीत असो, चित्रकला किंवा अभिनय एका वडीलानंतर मुले तो वारसा जपताना दिसतात. हिंदी,मराठी सर्वच सिनेसृष्टीत एका पिढीनंतर लगेच पुढची पिढी पदार्पणासाठी तयार असते. पण बाप आज्यानं नाव कमावलं असेल ते पोराला जमेलच असं नाही.

तरीही अशी काही उदाहरणं आहेत, त्यांनी आधीच्या पिढी पेक्षाही सिनेक्षेत्रात चांगलं नाव कमावलं आहे. विवेक ओबेरॉय (Vivek Oberoy), हे त्याचंच उदाहरण आहे. वडील सुरेश यांच्याकडे पाहत लहानाचा मोठा झालेल्या विवेकला अभिनयाची गोडी लागली. पण अभिनयाहून ही काही वेगळ्या कारणांमुळेच विवेक प्रकाशझोतात होता.

विवेकला पदार्पण करण्यासाठी राम गोपाल वर्मा (Ram Gopal Verma) सारखा दिग्दर्शक तर ‘कंपनी’ (Company) सारखा सिनेमा मिळाला होता. त्याला ‘कंपनी’ तल्या भूमिकेमुळे सर्वोत्कृष्ट पदार्पणाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याचा अभिनय सर्वांनाच आवडला. पण पुढे विवेकला फारसे हिट सिनेमे मिळालेच नाहीत. त्याचं नशीब किंवा निवडलेल्या कथा यापैकी काहीतरी एक खराब होतं.

या नंतर त्याचं ऐश्वर्या (Aishwarya Rai Bachchan) सोबत प्रेमप्रकरण सुरु झालं होतं. पण पुढं हे प्रकरण फिस्कटलं. कारण सलमान खानने (Salman Khan) विवेकला धमक्या दिल्या होत्या. या नंतर विवेकने कोणासोबतही नातं जोडलं नाही. तो सिनेक्षेत्रापासूनही दूर होता. यानंतर त्याने लग्न केल्याची बातमी आली. त्याच्या पत्नीचं नाव समजलं, प्रियांका अल्वा.

प्रियांका ही कर्नाटकचे माजी मंत्री दि’वं’ग’त. जीवराज अल्वा यांची कन्या. विवेक आणि प्रियांका यांची प्रेमकहाणी छान आहे.

बहुतेक मुलांच्या आई वडिलांची जशी इच्छा असते तशी विवेकच्याही आई – वडिलांचीही होती की विवेकचेही दोनाचे चार हात होऊ देत. आणि संसारी व्हावं, सुखी व्हावं… तेंव्हा विवेक आणि त्याची आई लंडनमध्ये होते. त्याच्या आईने त्याला प्रियांकाबद्दल सुचवलं. तिची माहिती दिली की ती सध्या फ्लोरेन्समध्ये आहे, तर त्याने तिची तिथे जाऊन भेट घ्यावी. पण त्याला हा आईचा सल्ला आजिबात पटला नाही. त्यानं आईचं म्हणणं साफ धुडकावून लावलं. पण आईनंही हार नाही मानली त्याला समजावत राहिली.

शेवटी त्यानं आईच्या म्हणण्याला दुजोरा दिला. आणि तिला भेटायला तयार झाला. पण त्याने आईला एक अट घातली की एक वर्ष ते दोघं सतत भेटत राहतील आणि जर योग्य वाटलं तरच एकमेकांशी लग्न करतील. ही अट आईलाही मान्य झाली. विवेक प्रियांका एकमेकांना भेटले. ते सतत भेटत राहिले, कारण प्रियांकाचा सहवास विवेकला आवडत होता, आणि काही महिने झाल्यावर २०१० मध्ये लग्नाचा निर्णय घेतला व लगेचच लग्न केलं. या जोडप्याला तीन वर्षांनी मुलगा झाला. लग्नाला पाच वर्षे झाल्यावर त्यांना मुलगी झाली.

विवेकने शेवटचा सिनेमा केला तो ‘पीएम नरेंद्र मोदी'( PM Narendra Modi). आता ‘रोजी: द सॅफ्रॉन चॅप्टर’ हा भयपट येणार आहे, त्यात मालिकाविश्वातील आघाडीची अभिनेत्री श्वेता तिवारी हिची कन्या ‘पलक’ सिनेमात पाऊल ठेवत आहे. विबेल केवळ सिनेमात कामच नाही करत तर त्याचं एक प्रोडक्शन हाऊस आहे. त्याची बाकी बऱ्याच क्षेत्रात गुंतवणूक आहे. विवेक चित्रपटाव्यतिरिक्त शिक्षण व आरोग्य क्षेत्राशी निगडीत आहे. एकूणच ‘हम दो, हमारे दो’ असं करून प्रियांका व विवेक खूप खुश आहेत.