आता हा छत्री डान्स होतोय व्हायरल, डान्स पाहून तुम्ही ही खुश व्हाल…

हल्ली सोशल मिडियावर काय व्हायरल होईल याचा नेम नाही. एखादी असाधारण गौष्ट असो की साधारण यावरून व्हिडिओ व्हायरल ठरत नाही. तर त्याला प्रेक्षकांचा किती प्रमाणात प्रतिसाद येतो यावरून हे व्हायरलचं गणित चालतं.

रोजच सोशल मिडियावर लाखो पोस्ट येत असतात. यामध्ये हर तऱ्हेच्या क्षेत्रांतल्या व्हिडिओ, इमेज, माहिती, अपडेट्स, ब्रेकिंग न्युज यांचा समावेश असतो. आज आम्ही आपल्यासमोर एका डान्सचा व्हायरल व्हिडिओ घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहुयात काय विशेष आहे या डान्स मध्ये!

आपल्याकडे कार्यक्रम म्हटलं की जल्लोष हा आलाच. याच जल्लोषात आणखी चार चांद लावण्याचं काम डान्समुळे होतं हल्ली लोक कार्यक्रमाच्या थीमनुसारही डान्स करू लागले आहेत. ज्यामुळे कार्यक्रमाची आणखीणच शोभा वाढत असते. कार्यक्रमाला उपस्थित असलेले सगळेजण याच गोष्टीचा आधिक आनंद घेताना दिसतात.

ज्यांना ज्यांना डान्सची आवड आहे ते सुद्धा डान्स करायला चालू करतात आणि ज्यांना डान्स येत नसतो तेही मनापासून जसा जमेल तसा डान्स करतात. नेहमीप्रमाणेच आजही एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणला आहे जो पाहून तुम्हाला खूप फ्रेश वाटेल.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कदाचित तुम्हालाही असंच नाचावसं वाटेलही. तुमच्या थकलेल्या मनाला थोडा विसावाही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मिळू शकेल. हा व्हिडिओ एका पार्टीमधील असल्याचं कळतंय. यामध्ये काही कपल डान्स करताना आपल्याला दिसून येत आहेत.

यातील कपलकडे बारकाईने बघाल तर स्त्रियांनी साड्या आणि पुरुषांनी फाॅर्मल कपडे घातल्याचे दिसुन येत आहेत. त्यामुळे सगळेच कपल आकर्षक दिसतायत यावरून हा व्हिडीओ एखाद्या विशेष समारंभाचा असावा असच प्रथमदर्शनी दिसतंय.

गाणे सुद्धा खूप सुंदर आहे. प्रत्येक कपल हे उत्तम पद्धतीने त्याच्या त्याच्या परीने डान्स करत आहे. आणि त्या क्षणांचा आनंद घेताना दिसत आहे. हल्ली अशा फंक्शन्समध्ये कपल डान्स हा एक ट्रेंडच बनलाय. लग्नसमारंभात तर हमखास वराचे आणि वधुचे मित्रपरिवार अशा पद्धतीने कपल डान्स करताना आढळून येतायत.

व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर तुम्हाला पिवळ्या साडीमध्ये असलेली महिला आणि निळ्या रंगाचा शर्ट घातलेला माणूस यांचा डान्स खूप आवडेल. सर्वांचेच चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा गाण्याला खूप साजेसे आहेत. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रेक्षक सुद्धा टाळ्या वाजवत आहेत. तुम्हीही हा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. तुमच्या करमणुकीसाठी असे अनेक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक आणि शेअर करा.