एक दिवसाच्या जेवणासाठी कचरा उचलून पैसे मिळवायचा ख्रिस गेल, आणि आज बनला जगप्रसिद्ध फलंदाज…

मेहनत केल्याशिवाय कोणतेही फळ मिळत नसते! त्यासाठी खूप परिश्रम करावा लागत असतो. तू मेहनत इतनी खमोशीसे कर की .. तेरी कामयाबी शोर मचा दे… असे खुपसे कलाकार असो किव्हा क्रिकेटर यांनी आपल्या हिम्मतीच्या बळावर आपले कर्तुत्व निर्माण केले आहे. आजपर्यंत ज्या खेळाडूंनी आपल्या मेहनतीतून एक वेगळा इतिहास रचला त्यांना प्रेक्षकवर्ग कधीही विसरू शकत नाही. त्यापैकीच एक आहे. क्रिकेटपटू ख्रिस गेल.

ख्रिस गेल हे नाव क्रिकेट चाहत्यांना माहीत नाही असे शक्य नाही. त्यांच्या फलंदाजी वेळी गोलंदाज पूर्ण घामाघामा होऊन जातो. ख्रिस गेल यांची एक खासियत आहे की ते जेव्हा क्रिकेट स्टेडियममध्ये प्रवेश नोंदवतात. तेव्हा त्यांना पाहून सगळे टाळ्या वाजवतात. त्याने या टाळ्याला प्रति उत्तर देऊन सगळ्यांचे मनोरंजक केले आहे. त्याची फलंदाजी पाहायला खूप सारे लोक आवर्जून उपस्थित असतात. त्याने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे सगळ्यांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे.

जेव्हा ख्रिस गेल खेळीसाठी स्टेडियमवर पोहचतो तेव्हा समोरील टीमचे नाकी नऊ येतात. आजपर्यंत आपल्या मेहनतीच्या बळावर त्याने टी- २० मधील खूप सारे रेकॉर्डस् मोडीत काढले आहेत. असे काही विक्रम त्याने मोडले आहेत जे मोडताना त्याला खूप सारे कष्ट घ्यावे लागले असतील. मित्रानो प्रत्येकाचे स्वप्न असते की आपण आपल्या जीवनात खूप उच्च स्थानी जावं. याच्याचबरोबर प्रत्येक क्रिकेटपटूची ईच्छा असते की त्याचे फलंदाजी कमाल करणारी असावी. यामुळे सगळे लोक आश्चर्यचकित होतील. हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते.

परंतु मित्रानो तुम्हाला विश्वास बसणार नाही की एकेकाळी कचरा उचलनारा ख्रिस गेल आज एक सुप्रसिद्ध खेळाडू आहे. ख्रिस गेलं यांचा जन्म २१ सप्टेंबर १९७९ रोजी वेस्ट इंडिजच्या जमैका येथे झाला होता. ख्रिस गेल यांचे वडील हे एक पोलीस होते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की ख्रिस गेल यांची आई रस्त्याच्या बाजूला बसून शेंगदाणे विकायची. आणि स्वतः ख्रिस हा कचरा गोळा करून त्यातून पैसे मिळवायचा. त्यांच्या कुटूंबाला खूप वेळा तर पैसे अभावी न जेवता झोपावे लागले आहे. पण ख्रिस गेल कुठेही लगबगला नाही त्याने स्वतःवर विश्वास ठेवला आणि आज तो या ठिकाणी आहे.

१९ व्या वर्षी त्याला पहिल्यांदा खेळता आले. १९९८ साली प्रथम श्रेणीत खेळत असताना त्याने कमाली दाखवली होती.ज्याप्रकारे त्याने बॅटिंग केली त्यामुळे निवड समितीचे त्याकडे लक्ष गेले. त्यानंतर त्यांना राष्ट्रीय संघात खेळता आले त्याची निवड झाली. १९९९ साली त्याने एकदिवसीय सामना खेळला होता