चंकी पांडेची पत्नी आहे इतकी सुंदर की..आजही सौंदर्याच्या बाबतीत मुलगी अनन्याला देते टक्कर..पहा

बॉलीवूड (Bollywood) मध्ये नवनवीन अभिनेता अभिनेत्री उदयाला येत असतात. त्यात शक्यतो स्टारकीड लोकांचा भरणा अधिक असतो. अशीच एक सुंदर स्टारकीड आहे अनन्या पांडे (Ananya Panday). Student of the year 2 या सिनेमातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. अनन्याचा ही चाहतावर्ग तयार झाला आहे.

चंकी पांडे (Chunkey Panday) यांच्या या कन्येच्या चेहऱ्यावर निरागसता आहे, तिच्या हास्याचेच लोक चाहते आहेत. अनन्याला हे सौन्दर्य तिच्या वडीलांपेक्षा तिच्या आईकडून मिळाले आहे. अनन्याच्या आईचं नाव आहे भावना पांडे (Bhavna Panday). खाण तशी माती म्हणतात ना त्याप्रमाणे आई भावना इतकी सुंदर आहे म्हणून अनन्या सुंदर दिसते.

भावना यांनी दिल्लीमध्ये असलेल्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स मधून बी.कॉम.ऑनर्सची पदवी घेतली आहे. भावना कायमच प्रकाशझोतापासून लांब असतात. जेंव्हा बॉलीवूड मध्ये वाईव्हज् सिरीज आल्यानंतर सर्वांना चंकी पांडे यांच्या पत्नीबद्दल कळलं आहे. त्या यानंतर प्रकाशात आल्या आहेत.

चंकी आणि भावना यांची प्रेमकहाणी तितकीच रोचक आहे. या दोघांची पहिली भेट झाली ती १९९६ मध्ये. हा काळ खरंतर खूप विचित्र होता, चंकी यांना अभिनेता म्हणून ओळख मिळाली होती पण सिनेमाच्या ऑफर येणं बंद झालं होतं. आणि चंकी यांचं करिअर जवळ जवळ संपलं असंच मानलं जातं होतं..चंकी यांनीही सिनेमा क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी भारत सोडून बांग्लादेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. भावना यांनी चंकींना आधार दिला. या दोघांनी एकमेकांना दोन वर्षे डेट केलं.

भावना यांच्या माहेरकडून या लग्नाला विरोध होता. पण भावना यांनी या विरोधाला न जुमानता चंकी यांची साथ देण्याचा निर्णय पक्का केला. चंकी यांचा काळजीवाहू स्वभाव यांवर भावना यांचं मन चंकी यांच्यावर जडलं होतं. आपल्या वाईट काळातही चंकी यांनी भावना यांची तितकीच काळजी घेतली, म्हणून भावना व चंकी यांनी जन्माची गाठ बांधली. १७ जानेवारी १९९८ ला या दोघांनी लग्न केलं. श्री व सौ. पांडे यांना दोन मुली आहेत. एक तर सगळ्यांना माहीत आहे, अनन्या पांडे तिने स्टुडंट ऑफ द इयर, पती-पत्नी और वो सारखे सिनेमे केले आहेत. तर छोटी जिचं नाव रिसा आहे. तिचं अजूनही शिक्षण चालू आहे.

भावना आणि चंकी यांचं कुटुंब पाली हिल भागात असलेल्या बंगल्यात राहतं. नव्वदीच्या दशकात हा बंगला खरेदी केला होता. फिल्मी दुनियेतल्या करिअर बरोबर एक हॉटेल पण आहे. त्या हॉटेलचं नाव ‘द एल्बो रूम’ नावाचं हे हॉटेल खार पश्चिम भागात आहे. तसेच भावना या स्वतः एक उद्योजिका आहेत. त्यांचा स्वतःचा ‘लव्हजेन’ या नावाचा एक फॅशन ब्रँड आहे.

भावना आणि चंकी यांच्या लग्नाला २३ वर्षे झाली आहेत पण आजवर या जोडप्यानं एकमेकांसमोर कधीही प्रेम व्यक्त नाही केलं, नाही तर आज कालची पिढी पहिल्या भेटीतही आय लव्ह यु बोलून रिकामे होतात. भावना आणि चंकी यांच्या वागण्यातून हेच समजून येतं की प्रेम ही बोलायची नाही तर नजरेतून समजुन घ्यायची गोष्ट आहे.