कौतुकास्पद: CISF च्या जवानाने वाचवला एका मुलीचा जीव..वर्दी काढून झाकली अब्रू..

मित्रहो सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक घटना आपण पाहत असतो. या व्हिडीओज मधून दिसत असलेल्या घटना आपल्या विचारांवर सुद्धा खूप प्रभाव पाडत असतात. त्यामुळे समाजात होत असलेले प्रकार पाहूनच पुढची पिढी घडत असते. नुकताच सोशल मीडियावर आणखीन एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो पाहून कोणीही सलामच करेल. एका जवानाचे तोंडभरून कौतुक करायला लावणारा हा व्हिडीओ आहे. अनेकांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या कमेंट दिल्या आहेत.

या व्हिडीओ मध्ये जीव संपवायला गेलेल्या मुलीचा जीव वाचवताना हा जवान दिसून येतो, एवढेच नव्हे तर त्याने अपघातात त्या मुलीचे कपडे फाटलेले पाहून आपली वर्दी तिच्या अंगावर झाकली आहे. हा प्रकार खरच देशाची मान उंचावतो. ही घटना आहे दिल्लीच्या जनक पुरी मेट्रो स्टेशन मधील. ३ऑगस्ट रोजी मंगळवारी ब्लु लाईनच्या जनक पुरी मेट्रो स्टेशनवर एक मुलगी आत्महत्या करायच्या हेतूने आली होती. ती पुढे पुढे चालत गेली व अचानक मेट्रोच्या समोर उडी घेतली.

पण तिने उडी घेताच मेट्रोच्या आवाक्यात येणार इतक्यात मेट्रोच्या ऑपरेटरने तो प्रकार पाहिला व लगेच इमर्जन्सी ब्रेक लावला. पण तेव्हा त्या मुलीचा पाय आणि कमरेचा भाग मेट्रोच्या खाली आला होता. ती गंभीर जखमी झाली होती तसेच त्यामुळे तिचे कपडे देखील फाटले होते. नेमकं त्याच वेळी CISF ची क्विक रिएक्शन टीम प्लॅटफॉर्मवर चेकिंग साठी आली असता जशी ट्रेन थांबली तशी त्यांनी लगेच ऍक्शन घेतली. व त्यातील एका सुरक्षकाने लगेच उडी घेतली आणि मुलीला वाचवले.

त्यावेळी मुलीचे कपडे देखील फाटले होते, ते पाहून घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या त्या सुरक्षकाने म्हणजेच नवकिशोर नायक आपली वर्दी उतरवली आणि तिच्या अंगावर टाकली. आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव निशा असून ती २१ वर्षाची आहे. ती पालन नगरच्या राज नगर मधील आहे. या घटनेची माहिती DMRC आणि CISF च्या सिनियर अधिकाऱ्यांना देण्यात आली होती, त्यावेळी लगेच ऍम्ब्युलन्स बोलवून त्या मुलीला माता चानन देवीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

या पूर्ण घटनेचा व्हिडीओ काँग्रेस पार्टीचे मीडिया पेनलिस्ट सुरेंद्र राजपूत यांनी बनवला आहे. सोशल मीडियावर अनेक लोक या व्हिडीओचे कौतुक करत आहेत. ही घटना आपल्याला खूप काही शिकवून जाते. जर प्रत्येकाने स्त्रीचा असाच सन्मान केला तर स्त्री नेहमीच सुरक्षित राहील. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.