पुष्पा चित्रपटातील सामी सामी या गाण्यावर डेव्हिड वॉर्नरच्या मुलीचा धमाकेदार डान्स!

सध्या खूप सारे ट्रेंड सोशलमीडियावर खूप जास्त प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यात आणखी एक ट्रेंड सध्या सोशलमीडियावर खूप प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका क्रिकेटपटूच्या मुलीने भारतीय सिनेमावरचे प्रेम दाखवले आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपूट डेव्हिड वॉर्नर याचे भारतीय संस्कृती आणि इतर गोष्टीवर असणारे प्रेम सर्वाना ठाऊक असेलच.

आता अलीकडे त्याला भारतीय गाण्याने वेड लावले आहे ते तुम्हाला दिसले असेल. क्रिकेटपूट डेव्हिड वॉर्नरला भारतीय गाण्याने जणू काही वेड लावून टाकले आहे तो सतत त्या गाण्यांवर काही न काहीतरी करत असतो. पण बास झालं आता डेव्हिड वॉर्नर पुराण! पण आता हाच वेडेपणा त्यांच्या मुलीत आला आहे. तिने अलीकडेच प्रदर्शित झालेला तामिळ तेलगू चित्रपट पुष्पा यातील श्रीवल्ली या गाण्यावर धुमाकूळ घातला आहे.

क्रिकेटपटू डेविड वॉर्नरने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये डेविड वॉर्नरची मुलगी तामिळ तेलगू चित्रपट पुष्पा यामधील गाणे ‘सामी सामी’ यातील रश्मीका मंदानाच्या स्टेप्स डान्स कॉपी करताना दिसत आहे. या डान्समध्ये त्यांच्या तिन्ही मुली खूपच सुंदर दिसत आहेत. पण व्हिडिओमध्ये पाहायला गेले तर सगळ्यांचे लक्ष वेधून घेते ती म्हणजे डेविड वॉर्नरची लहान मुलगी.

हा व्हिडीओ शेअर करत असताना डेविड वॉर्नरने कॅप्शनमध्ये असले टाकले आहे की आई वडील हा डान्स करण्याआधी आम्हाला हा डान्स करायचा होता. याआधील व्हिडिओत तुम्ही पाहिले असेल तर सामी सामी या गाण्यावर डेविड वॉर्नर नाचताना दिसला होता. जो व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना खूप आवडला.

हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला होता की पुष्पा फेम सुप्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनने देखील या व्हिडिओ वर कमेंट्स करत त्यांचे कौतुक केले होते.पुष्पा या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर हिंदी मध्ये हा चित्रपट सुपरहिट ठरला या चित्रपटासाठी हिंदीत आवाज मराठी आणि हिंदी अभिनेता श्रेयस तळपदे यांनी दिला आहे. जो प्रेक्षकांना सध्या खूप प्रमाणात आवडत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर १७ डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आजपर्यंत हा चित्रपट कमाई कमवत आहे.