आपण यांना पाहिलंत का? ‘तारक मेहता का…’ मालिका सोडल्यानंतर इतकी बदलली आहे दयाबेन…

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका म्हटलं की मनोरंजन हमखास. या मनोरंजनाचा अर्धा अधिक जिम्मा जिच्या खांद्यावर आहे, ती म्हणजे जेठालालची पत्नी दयाबेन. आपल्या घरच्यांवर खूप प्रेम करणारी, नवऱ्याकडून सतत बोलणी खाणारी, मात्र कधी कधी त्याचीच बोलती बंद करणारी, गरबा-प्रेमी, अहमदाबाद-प्रेमी, भावाला नेहमी पाठीशी घालणारी अशी ही दयाबेन सध्या मालिकेत दिसत नाहीये. मात्र प्रेक्षक तिला अजूनही विसरले नाहीयेत. त्यांना तिची नेहमीच आठवण येत राहते. आपल्या प्रेक्षकांना अशी वाट बघायला लावत दयाबेन नक्की कुठे गेली आहे?

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Disha Vakani (@disha.vakani)

दयाबेनची भूमिका अभिनेत्री दिशा वकानी करत होती. २००८ मध्ये मालिका सुरू झाल्यापासून दिशा मालिकेसोबत दयाबेन म्हणून होती. २०१७ मध्ये तिने मालिका सोडली. आता तिला मालिकेतून गायब झालेली पाहून प्रेक्षकांना तिची आठवण येणे साहजिक आहे. तर अशा दयाबेनने अलीकडेच तिचा एक फोटो सोशल मीडिया वर शेअर केला. मात्र तिला पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

दिशाने आपल्या प्रेग्नन्सीमुळे ‘तारक मेहता का…’ मालिका सोडली होती. तिला एक गोंडस मुलगी झाली आहे. आता आपला संपूर्ण वेळ ती आपल्या मुलीला देताना दिसत आहे. तिने आपल्या मुलीबरोबरचा एक फोटो नुकताच सोशल मीडिया वर शेअर केला. यामध्ये तिची मुलगी तिच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेली दिसत आहे. दिशाने कॅमेऱ्याकडे चेहरा केला आहे. मात्र ती या फोटोमध्ये खूपच वेगळी दिसत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by disha vakani 🔵 (@disha.vakani_)

तिच्या या नो मेकअप लूक मध्ये तिला ओळखणं कठीण झालं आहे. चेहऱ्यावर हसू असलं तरी ती बरीच थकलेली दिसत आहे. दयाबेनची भूमिका करताना सदैव उत्साही असलेली, कधीही गरबा खेळायला तयार असलेली दिशा या फोटोमध्ये अगदीच विरुद्ध दिसत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Disha Vakani (@disha.vakani)

दिशाने ड्रॅमॅटीक आर्टस् मधून शिक्षण घेतले आहे. २०१५ मध्ये तिने मयूर पहाडीसोबत लग्न केलं. नोव्हेंबर २०१७ मध्ये तिने प्रेग्नन्सीमुळे मालिका सोडली. ‘तारक मेहता का…’ मध्ये काम करताना तिला एका भागाचे जवळपास एक ते दीड लाख रुपये मानधन मिळत होतं. २०१७ मध्ये दरमहा ती साधारणपणे २० लाख रुपयांची कमाई करायची. तिच्याकडे एकूण ३७ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे कळते. या मालिकेमुळे तिला अनेक जाहिराती आणि चित्रपट मिळाले. अजूनही प्रेक्षक तिने ‘तारक मेहता का…’ मध्ये परत यावं म्हणून वाट पहात आहेत.