कोणत्या महालापेक्षा कमी नाही रितेश-जेनेलिया यांचा हा आलिशान बंगला, किंमत जाणून डोळे पांढरे कराल..

एक बंगला बने न्यारा
रहे कुनबा जिस्मे सारा
सोने का बंगला, चंदन का जंगला
विश्वकर्मा के द्वारा
अतिसुंदर प्यारा प्यारा

हे ब्लॅक- व्हाईट जमान्यातलं हे एक गाणं कधीतरी कानावर पडलं असेल. आणि आयुष्यात स्थिरता यावी म्हणून साधारण व्यक्तीची हीच इच्छा असते की आपलं एखादं घर, मग गाडी वगैरे वगैरे…पण आजकाल हे बंगला प्रकरण सामान्य लोकांच्या आवाक्याच्या बाहेरचं आहे. पण जे गडगंज आहेत त्यांना हे काही अवघड नाही.

आपल्या चित्रपट सृष्टीतील एक Cute Couple म्हणून जे ओळखलं जातं ते जेनीलिया (Genelia) व रितेश देशमुख (Riteish Deshmukh). हेच पती-पत्नी वर गाण्यात वर्णन केल्याप्रमाणे असलेल्या बंगल्यात राहतात. या जोडप्याचा हा आलिशान बंगला मुंबईच्या उच्छभ्रू वस्ती जुहू मध्ये आहे.

हा बंगला बाहेरून पांढऱ्या शुभ्र रंगात रंगवलेला आहे. त्याचं मुख्य प्रवेशद्वारही तशाच पांढऱ्या रंगाचं आहे. या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकामही केलं आहे. घराचा एकूणच नजारा बाहेरून पाहिल्यावर ते भव्य असणार याची कल्पना सहज येते. तो एक शाही महाल वाटावा असा बनवून घेतला आहे.


या घराच्या आतल्या भागाची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. आत एक जिना बनवला गेला आहे जो समोरासमोर दोन्ही बाजूंनी उघडला जातो. या जिन्याच्या मध्यभागी भिंतीवर माजी मुख्यमंत्री स्व’र्गी’य विलासराव देशमुख यांचा फोटो लावला आहे. अशा सुंदर जागी सहाजिकच फोटोही तितकेच सुंदर येतात. म्हणून रितेश आणि जेनेलियाच्या सोशल मीडिया अकाऊंटस वर त्यांचे या जागेवरचे छान फोटो आहेत.

या घरासाठी साजेसा असा भला मोठा दिवाणखाना बनवण्यात आला आहे. या इथे तेवढेच भले मोठे सोफे ठेवले आहेत, त्यांचा आणि इथल्या भिंतींचा मॅचिंग रंग करडा आहे.

बाकी घरच्या भिंतींवर म्हणजे अगदी सफेदी छाई हुई हैं. आणि त्यांची सुंदरता अजून वाढवण्यासाठी यांवर छान छान तसबिरी लावल्या आहेत. घरातल्या सगळ्या वस्तू खास आणि तितक्याच आकर्षक आहेत. जसं या सिनेमा वाल्यांना प्रकाशझोतात रहायला आवडतं तसंच अगदी घरातही असं असावं बरं कारण घरात या नंतर महत्वाचा प्रश्न असतो. त्यांनी प्रकाशयोजनाही उत्तम केली आहे.

अरे कानाकोपरा सोडला नाही, सगळं घर उजळून टाकलंय दोघांनी. भिंतींवर केवळ फोटोच नाही तर त्यांना खास सजवलं आहे. बऱ्याच सुंदर आणि युनिक गोष्टींनी भिंती अधिकाधिक आकर्षक केल्या आहेत. म्हणजे घराचे अंतरंग पाहिले की वाटेल की घर आहे की पंचतारांकित हॉटेल! त्यांना दोन मुलं आहेत. म्हणजे जितकं आलिशान व सुंदर घर आहे, तितकाच छान संसार आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.