‘देव’ सिनेमात करीना कपूर सोबत झळकली होती ही मराठमोळी अभिनेत्री, आता १७ वर्षानंतर दिसते अशी..

एक शांत, अहिंसावादी व देशभक्त असा कायद्याचा पदवीधर असणारा एक मुस्लिम तरुण, विनाकारण झालेल्या पोलीस कारवाईत त्याचे वडील मृत्यू पावतात आणि आलेल्या परिस्थितीमुळे त्याच्यात नकारात्मक बदल होतात. आणि तो काहीतरी विघातक कृत्य करतो. एक भ्रष्ट राजकारणी हे सगळं करायला त्याला भरीला पाडतो. त्याला या सगळ्या पासून परावृत्त करण्यासाठी त्याच्या आयुष्यात एक तरुणी येते.

त्याला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. पण या वाट चुकलेल्याची माहिती त्याला भरीला घालणारा राजकारणीच पोलिसांना देतो. आणि कायद्यापुढे कोणीच नाही असं समजणारा एक पोलीस अधिकारी त्या मुस्लिम तरुणाच्या मागावर असतो. तर असा खेळ असलेली ही ‘देव’ (Dev) या सिनेमाची कथा.

यांत कायदा आणि सुव्यवस्था जपणारा कर्तव्यदक्ष पोलिसाधिकारी  अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी साकारला आहे. तर वाट चुकलेला तरुण फरदिन खान (Fardeen Khan) व त्याचं आयुष्य बदलू पाहणारी तरुणी म्हणजे करीना कपूर (Kareena Kapoor). तर अमरीश पुरी, ओम पुरी, मिलिंद गुणाजी असे सरस कलाकार या सिनेमात होते. या सिनेमातील भूमिकेसाठी करिनाला समीक्षकांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. प्रसिद्ध छायादिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. आज या सिनेमाला १७ वर्षे झाली आहेत.

करीनाची साथ देण्यासाठी या सिनेमात अजून एक छान अभिनय करणारी व्यक्ती होती, तिनं कुरेशी ही भूमिका केली होती. तुम्हाला लक्षात आलं असेल की कुणाबद्दल विषय चालला आहे! तर त्या व्यक्तीचं नाव आहे अमृता सुभाष. (Amruta Subhash) नुकतीच अमृताने या सिनेमाबद्दल असलेल्या आपल्या आठवणी व त्या संदर्भातला आपला एक फोटो शेअर केला आहे. या सिनेमाने त्या वर्षी समीक्षकांचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला होता.

अमृता सुभाष हे मराठी चित्रपटाला परिचित असलेलं नाव आहे. अमृताने आजवर ज्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत ते कलात्मक आहेत. नाटकं ही तितकीच दमदार आहेत.

तिचा पहिला सिनेमा होता श्वास, जो २००४ ला भारताकडून ऑस्करला पाठवला गेला होता. पन्नासेक वर्षांनी पुन्हा एकवार मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. १९९७ पासून अमृताने नाट्यक्षेत्रात पदार्पण केलं होतं. ‘ती फुलराणी’ सारखं गाजलेलं नाटक; ते नव्या संचात आलं तेंव्हा तिने त्यात मुख्य भूमिका केली होती.

यानंतर झी मराठी वरची तेंव्हा गाजलेली सिरीयल ‘अवघाची संसार’ ही मालिका ही तिने केली होती. देवराई, वळू, विहीर, हापूस, किल्ला सारखे उत्कृष्ट मराठी सिनेमे त्याचबरोबर रमण राघव, फिराक, कॉन्ट्रॅक्ट, सिलेक्शन डे, गली बॉय (Gully Boy) सारखे हिंदी चित्रपट तर सॅक्रड गेम्स २ (Sacred Games 2)  व आता येऊ  घातलेली ‘बॉम्बे बेगम्स’ (Bombay Begums) सारख्या जबरदस्त वेबसेरिज तिने केल्या आहेत.

अमृताने अंजिठा सिनेमासाठी पार्श्वगायनही केलं आहे. तर नाट्यकर्मी, सिनेअभिनेत्री व पार्श्वगायिका अशी अमृता म्हणजे मनोरंजनाचं उत्तम पॅकेज आहे. इथून पुढेही रसिकप्रेक्षकांचं ती उत्तमप्रकारे मनोरंजन करत राहील.