निवृत्तीनंतर धोनी आता या ७ बिजनेस मधून कमावतोय भरपूर पैसा, जाणून थक्क व्हाल..

महेंद्रसिंह पानसिंग धोनी (M.S.Dhoni) हे नाव माहीत नसलेल्या भारतीय व्यक्ती फार कमीच असतील. ज्यांना क्रिकेट अजिबात आवडत नाही पण धोनी आवडतो असेही लोक आहेत. धोनीची क्रिकेट कारकिर्दच तशी आहे. क्रिकेटच्या तीनही प्रकारात धोनीने भारताला यश मिळवून दिलं आहे. टी-२०, एकदिवसीय विश्वचषक, कसोटी मध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर त्याने संघाला आणले होते.

सौरव गांगुली (Saurav Ganguli) नंतर भारताला जिंकण्याची सवय धोनीने लावली.  ९ जुलै २०१९ ला त्याने शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता आणि अचानकपणे १५ ऑगस्ट २०२० च्या पूर्वसंध्येला त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पण अजूनही धोनीची कमाई चालूच आहे… जाणून घेऊयात त्याच्या कामाईबद्दल,

अशी करतो धोनी कमाई-

जाहिराती:
आपण टीव्हीवर जाहिराती पाहत असतो, त्यात बऱ्याच जाहिरातींमधून धोनी आपल्याला दिसतो. आजही धोनी मोठ मोठ्या ब्रँड्सचा ब्रँड अ‍ॅम्बसेडॉर आहे. यांत Go Daddy, भारत व मराठी मॅट्रिमोनी, कार्स २४, बुस्ट, स्निकर, कोलगेट सारख्या बड्या कंपन्या आहेत. आपला ब्रँड मोठा करण्यासाठी क्रिकेटरची मदत घेणे हा प्रघात बनला आहे. त्यामुळे धोनीसह बऱ्याच क्रिकेटपटूंना चिक्कार पैसे मिळतात.

हॉटेल:
धोनीच्या हॉटेलचं नाव ‘माही रेसिडेंट’ आहे. हे हॉटेल त्याच्या गावी म्हणजे रांचीत आहे. या हॉटेलमध्ये त्याची भागीदारी आहे व त्याचा गुंतवणुकीत मोठा हिस्सा आहे. इथून त्याला भरपूर उत्पन्न मिळते.

रेसिंग:
सुपर स्पोर्ट्स वर्ल्ड चॅम्पियनशिप या प्रसिद्ध रेसिंग स्पर्धेतील मधील ‘माही रेसिंग टीम इंडिया’ या संघाचे धोनीकडे मालकी हक्क आहेत, यांत त्याचा भागीदार आहे तेलुगू सिनेसृष्टीचा नं. १ सुपरस्टार नागार्जुन (Akkineni Nagarjuna). कारण धोनीचं बाईक प्रेम जगजाहीर आहे. त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या देशी आणि विदेशी दुचाकी गाड्यांचं कलेक्शन आहे. हे आपण त्याच्या बायोपिकमध्ये पाहिलं आहे.

हॉकी:
आयपीएल पाठोपाठ देशी लीग्सचं पेव फुटलं आहे. त्यात अजून एका लीगची भर पडली आहे. ती म्हणजे हॉकी इंडिया लीग. त्यातील रांची रेज् या संघाचे मालकी हक्क ही धोनीने घेतले आहेत.

फुटबॉल:
या देशी लीग्समधील अजून एक लीग आहे फुटबॉलची. तिचं नाव आहे, इंडियन सुपर लीग (Indian Super league.) यांतील चेन्नईन फुटबॉल क्लब (Chennaiyin FC) चा मालक धोनी आहे. त्याच्यासोबत अजून एकाकड़े याची मालकी आहे, तो म्हणजे अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan).

स्वतःचा ब्रँड
२०१६ मध्ये धोनीने एक ब्रँड विकसित केला आहे. हा लाईफ स्टाईल ब्रॅण्ड आहे. सेव्हन (SEVEN) असं त्या ब्रॅण्डचं नाव आहे. याचे  स्पोर्टसवेअर आणि कॅज्यूअल या प्रकारची उत्पादने आहेत. सेव्हनचा ब्रँड अ‍ॅम्बसेडॉर धोनी आहे. फुटवेअर सोडून अन्य उत्पादनांची मालकी र्हीती ग्रुपकडे आहे. फुटवेअरचा मालक धोनी आहे.

मनोरंजन:
मनोरंजन क्षेत्रातही धोनीने पदार्पण केलं आहे. त्याची एक मनोरंजन कंपनी आहे, ‘धोनी एंटरटेनमेंट’ (Dhoni Entertainment). २०१९ मध्ये या कंपनीची स्थापना झाली. हॉटस्टार स्पेशलवर (Hotstar Special) आलेली एक जबरदस्त मालिका ‘रोअर ऑफ द लायन’ (Roar of the Lion) ही याच कंपनीची निर्मिती आहे.

फिटनेस:
क्रिकेट मधून निवृत्ती घेऊनही धोनीचा फिटनेस जबरदस्त आहे. तो स्वतः ही फिटनेस व्यवसायात उतरला आहे. स्पोर्ट्स फिट प्रा. लि. (Sports Fit Pvt. Ltd.)न ही त्याची कंपनी संपूर्ण देशात  शेकडो जिम चालवते.

या सगळया द्वारे धोनीला भरपूर पैसे मिळतात. आणि त्याची हे श्रीमंती पाहून फॉर्ब्स इंडियन सेलिब्रिटींच्या निवडल्या गेलेल्या १०० जणांच्या यादीमध्ये धोनी पाचव्या स्थानावर होता. क्रिकेट विश्वाला रामराम केल्यानंतर धोनी उद्योग विश्वातही तितकाच चमकतो आहे. त्याचे तारे बुलंद आहेत.

त्याची २०१८ ची आर्थिक कमाई जवळपास १०२ करोड इतकी होती. २०१९ मध्ये ती वाढून अंदाजे १४० करोड च्या जवळ गेली. तो जसे धावांचे डोंगर रचायाचा तसे आता संपत्तीच्या राशींचे रचतो आहे. एकूण काय तर क्रिकेट असो की उद्योग जगत, ‘माही मार रहा है’.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.