‘या’ प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का? आता दिसते अशी…

मराठी चित्रपटसृष्टीत ऐंशीच्या दशकात अनेक उत्तम अभिनेत्री होऊन गेल्या. त्यांनी आपल्या अभिनयाने ते दशक गाजवले होते. अनेक जातिवंत चित्रपट आणि त्यातील अशा दिग्गज अभिनेत्रींचा अभिनय हे अगदी उत्तम जमून आलेले गूळपीठ होते. अशीच एक अभिनेत्री होती, जिने ‘हेच माझं माहेर’ या चित्रपटातून आपली विशेष छाप पाडली होती. आपल्या मनोवेधक हावभावांनी आणि हृदयस्पर्शी डायलॉग डिलिव्हरीने या अभिनेत्रीने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती.

या अभिनेत्रीचं नाव आहे शर्मिला मेढेकर. १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हेच माझं माहेर’ या चित्रपटात शर्मिलाने आपल्या अभिनयाची वेगळीच झलक दाखवली. या चित्रपटात तिच्याबरोबर सुलभा देशपांडे, मधू कांबीकर, रवींद्र महाजनी, अशोक सराफ, मोहन गोखले, रंजना अशा मुरलेल्या कलाकारांची फौज होती. मात्र शर्मिला मेढेकर हे नाव प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिले.

‘हेच माझं माहेर’ बरोबरच ‘घाबरायचं नाही’ (१९९०) आणि ‘सोम मंगल शनी’ (१९८८) या चित्रपटांमधील शर्मिला मेढेकर यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. सध्या मात्र शर्मिला मेढेकर हे नाव फारसे चर्चेत नाही. गेली अनेक वर्षं शर्मिला मेढेकर मोठ्या पडद्यापासून लांब आहेत. शर्मिला यांनी प्रसिद्ध चित्रपट निर्माते सतीश कुलकर्णी यांच्याबरोबर लग्न केले आणि त्या ‘शर्मिला मेढेकर’ च्या ‘शर्मिला मेढेकर-कुलकर्णी’ झाल्या.

शर्मिला यांचे पती सतीश कुलकर्णी यांचे ‘श्री तुलसी प्रॉडक्शन’ या नावाने प्रॉडक्शन हाऊस आहे. या निर्मिती संस्थेअंतर्गत अनेक उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. नवरी मिळे नवऱ्याला (१९८४), गंमत जंमत (१९८७), एका पेक्षा एक (१९९०), जमलं हो जमलं (१९९५), लपून छपून (२००६) अशा अनेक सुप्रसिद्ध चित्रपटांची निर्मिती या प्रॉडक्शन हाऊस तर्फे करण्यात आली आहे. यातील अनेक चित्रपटांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

facebook

शर्मिला मेढेकर-कुलकर्णी यांच्या ‘हेच माझं माहेर’ या चित्रपटही त्यांच्या अभिनयाबरोबरच चित्रपटातील गाण्यांनी देखील विशेष लक्ष वेधून घेतलं होतं. अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर यांच्या आवाजातील ‘ये अबोली लाज गाली’, ‘कळले काही तुला’, ‘कळले काही मला’ अशा श्रवणीय गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकले होते.

facebook

तुमच्या आवडत्या कलाकारांच्या बाबतीतल्या अशाच काही गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत असतो. तुमच्या आवडत्या कलाकारांचे असे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया हॅन्डल्सना जरूर फॉलो करा. तसेच आमचे तुम्हाला आवडलेले लेख लाईक आणि शेअर करायला विसरू नका.