‘डिंपल गर्ल’ प्रीती झिंटाने दिली गुड न्यूज! ४६ व्या वर्षी झाली आई…

आपल्या अभिनयाबरोबरच बॉलिवूडमध्ये आपल्या गालांवरील गोड खळ्यांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे प्रीती झिंटा. सध्या जरी ती कोणत्याही चित्रपटात दिसत नसली तरी या गालांवर खळ्या पडून हसणाऱ्या मुलीला कोणीच विसरू शकत नाही. ‘दिल से’ (१९९८) चित्रपटातून प्रीतीने बॉलिवूडमध्ये आपली अभिनय कारकीर्द सुरू केली. पुढे क्या कहना (२०००), चोरी चोरी चुपके चुपके (२००१), दिल चाहता है (२००१), दिल है तुम्हारा (२००२), अरमान (२००३), कल हो ना हो (२००३), कोई मिल गया (२००३), वीर झारा (२००४), सलाम नमस्ते (२००५), कभी अलविदा ना कहना (२००६) अशा कितीतरी चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली.

तर अलीकडेच प्रीतीने एक गोड बातमी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. आपण जुळ्या मुलांची आई झाल्याची बातमी तिने सोशल मीडिया वर पोस्ट करत दिली आहे. वयाच्या ४६ व्या वर्षी ही अभिनेत्री सरोगसी पद्धतीने आई बनली आहे. “मला सगळ्यांबरोबर ही गोड बातमी शेअर करायची आहे. जय आणि जिया या आमच्या दोन मुलांचे स्वागत करताना मला आणि जीनला खूपच आनंद होत आहे. आमच्या आयुष्यातील या नव्या पर्वाबद्दल आम्ही खूपच उत्सुक आहोत. डॉक्टर्स, नर्सेस आणि आमच्या सरोगेट आईचे आम्ही मनापासून आभार मानतो,” अशा आशयाची पोस्ट तिने केली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

२०१६ मध्ये प्रीती झिंटाने आपला १० वर्षांनी लहान असलेला अमेरिकन पार्टनर जीन गुडइनफ बरोबर लग्नगाठ बांधली. लॉस अँजेलिस मध्ये हा विवाहसोहळा पार पडला. हा सोहळा खूपच वैयक्तिक स्वरूपाचा होता. प्रीतीच्या लग्नानंतर जवळपास ६ महिन्यांनी याची बातमी प्रसार माध्यमांना मिळाली. लग्नानंतर प्रीती लॉस अँजेलिस मध्येच रहात असून कधीतरी ती भारतभेटीवर येत असते. लग्नानंतर ५ वर्षांनी तिने आपल्या आयुष्यात आलेल्या या आनंदाबद्दल माहिती दिली आहे. आपल्या मुलाचे नाव तिने जय ठेवले असून मुलीचे नाव जिया ठेवले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

अभिनेत्री असण्याबरोबरच प्रीती सामाजिक कार्यांमध्येही भाग घेताना दिसते. स्त्रीभ्रूण हत्याविरोधी चळवळीत ती बऱ्याच वेळा भाग घेताना दिसते. लग्नापूर्वीच म्हणजे २००९ मध्येच तिने उत्तराखंडच्या ऋषिकेशमधील शीशम झाडी येथील मदर मिरॅकल स्कूलमधील ३४ मुली दत्तक घेतल्या आहेत. तेव्हापासून ती या मुलींच्या शिक्षणाचा खर्च करते आहे. वर्षातून दोन वेळा ती या मुलींना भेटण्यासाठी जात असते.