एखाद्या आमदाराच्या बॉडीगार्ड पेक्षा हि जास्त पगार घेतो दीपिका पादुकोणचा बॉडीगार्ड ‘जलाल’, त्याचा महिन्याचा पगार जाणून थक्क व्हाल..

मोठी सेलेब्रिटी आली म्हणजे त्यांच्या रक्षणाची जबाबदारी आली. आजकाल बॉलिवूड मधील बरेच कलाकार यासाठी भरमसाठ पैसे खर्च करतात. सलमान खान, अक्षय कुमार, दीपिका पादुकोण हे कलाकार आपल्या बॉडीगार्डवरती खूप पैसे खर्च करतात. आज आम्ही या लेख मध्ये दीपिका पादुकोणच्या बॉडीगार्ड बद्दल सांगणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या बॉडीगार्डचे नाव जलाल असून, तो बऱ्याच वर्षांपासून अभिनेत्रीची सुरक्षितता सांभाळत आहे. त्या बदल्यात त्याला भरमसाठ रक्कम मिळते. अभिनेत्री जलाल सोबत अंगरक्षक म्हणूनच नव्हे तर भाऊ म्हणून वागते.

बॉलिवूडमध्ये असे काही तारे आहेत जे त्यांच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड ठेवतात. बहुतेक तारे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जातात, त्यांना बॉडीगार्ड आयोजकांद्वारे प्रदान केले जातात. असे काही सेलेब्स आहेत जे प्रत्येक कार्यक्रमात आपली सुरक्षा ठेवतात. काही जण पगारावर बॉडीगार्ड ठेवतात. यापैकी पहिले नाव सलमान खानचे आहे. त्यांच्याशिवाय टॉप महिला स्टार दीपिका पादुकोणसुद्धा बॉडीगार्ड ठेवते.

असे म्हटले जाते की जलाल फक्त दीपिकासाठी अंगरक्षक नसून दीपिकासाठी तो एका भावासारखा आहे. एका अहवालात असा दावाही करण्यात आला आहे की, अभिनेत्री रक्षाबंधनाला आपल्या बॉडीगार्डला राखी देखील बांधते.

अभिनेत्रीचे रक्षण करणार्‍या जलालच्या पगाराबद्दलही बरीच चर्चा आहे. लोकांचा असा अंदाज आहे की त्यांना मोठा पगार मिळालाच पाहिजे. होय, जर अहवालांवर विश्वास ठेवला तर जलालचा पगार वार्षिक ८० लाख रुपये इतका आहे. दीपिका आणि रणवीर यांचा लग्नामध्ये जलालने संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी सांभाळली होती.

कार्यक्षेत्रात दीपिकाला गेल्या वर्षापासून बरेच नवीन प्रोजेक्ट मिळाले आहेत. ती तिच्या आगामी नाग अश्विन चित्रपटामध्ये बाहुबली फेम प्रभास सोबत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चनचीही महत्त्वपूर्ण भूमिका करतील असे सांगितले जात आहे. वृत्तानुसार या चित्रपटाचे बजेट ३०० कोटी असून दीपिकाने या चित्रपटासाठी ८ कोटी फीस आकारली आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.