दिव्या दत्ताने शेअर केला सलमान खान सोबतचा फोटो! फोटो आहे इतका जुना..

अभिनेत्री दिव्या दत्ता आपल्या अभिनयामुळे खूप प्रसिद्ध आहे. सोशल मीडिया वर देखील ती बऱ्यापैकी सक्रीय असते. अलीकडेच तिने सोशल मीडिया वर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची सध्या सोशल मीडिया वर बरीच चर्चा होताना दिसत आहे. याला कारणही तसेच घडले आहे. कारण हा फोटो खूपच खास आहे. हा एक थ्रोबॅक फोटो आहे. या फोटोमध्ये अभिनेता सलमान खान आहे, मात्र त्याच्या शेजारी उभी असलेली चिमुरडी मात्र कोणालाच ओळखता येत नाहीये.

हा एक खूपच जुना फोटो आहे. अगदी सलमान खानच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातला. फोटोमध्ये सलमान खान लगेच ओळखू येत आहे. मात्र त्याच्या डाव्या बाजूला एक मुलगा असून उजव्या बाजूला एक मुलगी उभी आहे. ही दोन मुले कोण आहेत, हे मात्र कोणालाच ओळखता येत नाहीये. तर मंडळी, या फोटो मधील ती छोटी मुलगी म्हणजेच अभिनेत्री दिव्या दत्ता आहे. नुकताच तिने हा फोटो सोशल मीडिया वर शेअर करत या फोटोमागची आठवण सांगितली.

हा फोटो शेअर करत दिव्या दत्ता लिहिते, “एक मोठा थ्रोबॅक फोटो सापडला! उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही जेव्हा मुंबईला गेलो होतो, तेव्हा मी आणि राहुलने माझ्या सगळ्यात आवडत्या अभिनेत्यासोबत फोटो काढला होता. जरा माझ्या उत्साही एक्सप्रेशन्सकडे तरी बघा! काही वर्षांनंतर मी त्याच्याबरोबर स्क्रीन शेअर केली.” दिव्या आणि तिचा भाऊ राहुल ही ती फोटोतील दोन लहान मुले आहेत.

दिव्या दत्ताने १९९५ मध्ये सलमान खानसोबत ‘वीरगती’ चित्रपटात काम केलं होतं. त्यानंतर ती आणि सलमान २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बागबान’ चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटात दिव्याने सलमानच्या वहिनीची भूमिका साकारली होती. दिव्या दत्ताने या फोटोमधून सलमान खान हा तिचा नेहमीच आवडता अभिनेता असल्याचं सांगितलं आहे. दिव्या या फोटोमध्ये खूपच खूष दिसत आहे.

सलमान खानच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं, तर तो सध्या छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस १५’ हा रिऍलिटी शो होस्ट करताना दिसत आहे. लवकरच तो ‘टायगर ३’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्या बरोबर कतरिना कैफ आणि इम्रान हाशमी देखील असणार आहेत. तसेच सलमान आगामी ‘किक २’ आणि ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटांमध्येही ऍक्शन करताना दिसणार आहे.