‘मुलगी झाली हो’ मधील दिव्याने या कारणामुळे सोडली मालिका, समोर आले मोठे कारण..

आपल्याकडे दिवेलागण झाली, की मुलं शुभंकरोती वगैरे म्हणायची; आता म्हणतात की नाही माहीत नाही. पण एक गोष्ट घराघरात घडते. दिवा बत्ती झाली की टीव्ही सुरू केला जातो आणि आमच्या माता- भगिनी हरवून जातात त्या मालिकांमध्ये. ७ ला जो हा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू होतो तो थेट झोपेपर्यंत चालू राहतो. आपल्या आयुष्यापेक्षा या सिरिअल मध्ये काय काय घडतं याचीच जास्त उत्सुकता असते.

हिंदीचे तर आहेतच पण प्रादेशिक भाषांमध्येही भरपूर चॅनेल आहेत आणि त्यावर भरपूर सिरिअल्स चालू आहेत. त्यातली पात्रं प्रेक्षाकांना इतकी जवळची वाटू लागतात. बातम्यांच्या वाहिन्यांवरून त्यांच्या एकंदरीत आयुष्याची खबरबात घेतली जाते.

अशीच लोकप्रिय एक मालिका आहे ‘मुलगी झाली हो’. या स्टार प्रवाह (Star Pravah) मालिकेत असणाऱ्या सिद्धांत, माऊ, शौनक या पात्रांवर प्रेक्षक खूप प्रेम करतात. पण यातल्या दिव्याच्या नावाने तेवढीच बोटं मोडली जातात कारण तिची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. ही भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे प्रतीक्षा मुणगेकर. या दिव्याच्या खलनायकी भूमिकेमुळे प्रतिक्षाला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. पण नुकतीच प्रतिक्षाने इन्स्टाग्रामवर एक संदेश पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by 𝙿𝚛𝚊𝚝𝚒𝚔𝚜𝚑𝚊 𝙼𝚞𝚗𝚐𝚎𝚔𝚊𝚛 (@pratikshamungekarofficial)


“नमस्कार, आता पर्यंत आपण माझ्या मुलगी झाली हो या मालिकेतील दिव्या ह्या भूमिकेसाठी भरभरून प्रतिसाद दिलात,प्रचंड प्रेम दिलेत या साठी मी आपली मनापासून आभारी आहे.
तुमच्या शुभेच्छा या नेहमी माझ्या पाठीशी असतातच.

 

View this post on Instagram

 

A post shared by 𝙿𝚛𝚊𝚝𝚒𝚔𝚜𝚑𝚊 𝙼𝚞𝚗𝚐𝚎𝚔𝚊𝚛 (@pratikshamungekarofficial)

या पुढील आयुष्यात ही माझ्यावरचे हे तुमचं प्रेम तुमचा प्रतिसाद असाच निरंतर कायम राहो. भेटूया लवकरच
धन्यवाद !!!”, असं या पोस्ट मध्ये म्हणलं आहे.

ही पोस्ट वाचून तिच्या चाहत्यांच्या भुवया नक्कीच उंचावल्या आहेत.
प्रतीक्षा ‘मुलगी झाली हो’ ही मालिका सोडणार असल्याचा सूर या पोस्टमधून वाटतो आहे.
असं काय झालं की अचानक प्रतिक्षाने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला? पडद्यामागे काही घडलं का? हे तिच्या चाहत्यांना जाणून घ्यायचं आहे. तर कुठेच काहीही घडलं नाही आहे. तर प्रतिक्षाला एक दुसरी मालिका मिळाली आहे.

कलर्स मराठी वरच्या ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत ती आता भूमिका करताना दिसणार आहे. २१ जून २०२१ पासून ही मालिका सुरू झाली आहे. कलर्स मराठी (Colors Marathi) या वाहिनीशी प्रतिक्षाचं नातं तसं जुनं आहे. या आधी प्रतिक्षाला प्रेक्षकांनी तीन वर्षांपूर्वी आलेल्या ‘घाडगे अँड सून’ या मालिकेत पाहिलं आहे.

पुन्हा एकदा कलर्सचं सवयीचं वातावरण, आणि एक नवीन भूमिका म्हणून प्रतिक्षा आणि काहीतरी नवीन पाहायला मिळणार म्हणून तिचे चाहते दोघेही उत्सुक आहेत.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.