दिव्या आणि अक्षयची भन्नाट लव्हस्टोरी..सुरुवातीला या कारणाने दिला होता नकार दोघांनीही, पण नंतर..?

मित्रहो आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती येणार असेल तर ती येतेच, कारण घडणाऱ्या घटनांना आपण थांबवू शकत नाही. तसेच आपल्या साठी जो जोडीदार म्हणून आपल्या आयुष्यात येणार असतो त्याच्याबद्दल कोणालाच पूर्वकल्पना नसते मात्र हळूहळू चित्र पालटत जाते आणि आपली आपल्या जोडीदाराशी ओळख होते. मित्रहो या जगात अनेक लव्हस्टोरी आहेत, आणि अनेकांना त्या ऐकण्यात एक निराळीच मजा येते. आज देखील आपण एक भन्नाट लव्हस्टोरी जाणून घेणार आहोत. यामध्ये अभिनेत्री दिव्या आणि तिचा प्रियकर अक्षय आहे.

“मुलगी झाली हो” मालिकेतील लोकप्रिय झालेली अभिनेत्री दिव्या सुभाष ही अक्षय घरतच्या प्रेमात आहे, ही खबर सोशल मीडियावर आता सर्वानाच माहीत आहे. नुकताच त्यांचा टिळा डे साजरा झाला, त्यामुळे सोशल मीडियावर त्यांचे खूपसे एकत्र फोटो सुद्धा पाहायला मिळाले आहेत. पण आता लग्नासाठी तयार झालेल्या दिव्या आणि अक्षयने सुरुवातीला एकमेकांना नकार दिला होता. त्यांची ही मजेशीर प्रेमकथा लॉकडाऊन मधील आहे. ज्यावेळी सर्वकाही स्थगित होत त्यावेळी या दोघांनी आपल्या प्रेमाला सुरुवात केली होती.

मागील दोन वर्षांपासून या दोघांची ओळख आहे, अक्षय हा एक फिटनेस ट्रेनर आहे मात्र तो परदेशी एका बँकेसाठी सुद्धा काम करतो. अक्षय आपल्या जोडीदाराच्या शोधात होता, दरम्यान त्याने दिव्याची प्रोफाइल पाहिली. त्याने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. पण जवळपास १५ दिवसानंतर दिव्याने ती पाहिली आणि अक्षयची पूर्ण माहिती घेऊन स्वीकारली. नंतर मग त्यांचे बोलणे सुरू झाले, चॅटिंग होऊ लागली. हळूहळू व्हिडीओ कॉल आणि कॉलवर बोलणे सुरू झाले. पुढे त्यांनी भेटण्याचा निर्णय घेतला आणि जेव्हा हे दोघे समोर आले तेव्हा दोघे पण चकित झाले होते.

त्यावेळी दिव्याला पहिल्यांदा पाहिल्यावर अक्षय ने विचार केला की ही खूप लहान आहे आणि तसाच विचार दिव्याने सुद्धा केला की ही खूप मोठी आहे. मग रात्री पुन्हा जेव्हा कॉलवर बोलणं झालं तेव्हा दोघांनीही आपला नकार कळवला. पण अक्षयला दिव्या शिवाय राहवत न्हवते, मग त्याने पुन्हा बोलणे सुरू केले आणि त्यांचा संवाद नव्याने सुरू झाला. पुढे दोघांनीही घरी सांगण्याचा निर्णय घेतला, पण जेव्हा दिव्या एक अभिनेत्री आहे हे अक्षयच्या घरी समजले तेव्हा कलाकारांना वेळेचे बंधन नसते, रात्री अपरात्री शूटिंगला जावे लागते यकारणास्त्व त्याच्या घरच्यांनी नकार दिला.

मात्र हळूहळू त्याच्या घरच्यांनी दिव्याला पसंती दर्शवली, त्यांना सुद्धा दिव्या आवडली. त्यामुळे आता त्यांच्या नात्याला बढती मिळाली असून लवकरच ते दोघे लग्न करण्याची दाट शक्यता आहे. दिव्या आणि अक्षय यांच्यातील बॉंडिंग खूपच सुंदर आहे, प्रेमातील रुसवा फुगवा तर असतोच पण त्यांना विसरून पुन्हा प्रेम करण्याची त्यांची ओढ त्यांच्या नात्याला घट्ट बनवते. म्हणून तर अनेकांना त्यांची जोडी खूप आवडते. त्यांची ही जोडी अशीच गोड राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.