विद्या बालनच्या ‘या’ बहिणी बद्दल तुम्हाला माहीत आहे का? ती देखील आहे अभिनेत्री…

अभिनेत्री विद्या बालन बॉलिवूड मधील एक अत्यंत गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. परिणिता (२००५), लगे रहो मुन्नाभाई (२००६), भूलभुलैया (२००७), पा (२००९), इश्किया (२०१०), द डर्टी पिक्चर (२०११), कहानी (२०१२), तुम्हारी सुलू (२०१७), मिशन मंगल (२०१९) अशा चित्रपटांमध्ये काम करत तिने तिच्या अभिनय कौशल्यांची चुणूक दाखवून दिली आहे. कोणत्याही गॉडफादर शिवाय विद्याने आपले करिअर घडवले आहे.

अशीच आहे तिची एक बहीण, जिने स्वतःच्या कौशल्यांच्या बळावर अभिनेत्री म्हणून नाव कमावले आहे. तिचे नाव आहे प्रियामणी. प्रियामणी ही विद्या बालनची चुलत बहीण आहे. प्रियामणी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत गाजलेलं नाव आहे. ३७ वर्षीय या अभिनेत्रीचा जन्म ४ जून १९८४ रोजी कर्नाटकमधील बंगलोर येथे झाला. तिच्या वडीलांचे नाव वासुदेव मणी अय्यर असून आईचे नाव लतामणी अय्यर आहे. तिच्या मोठ्या भावाचे नाव विशाख असून तो आपल्या वडीलांना त्यांच्या व्यवसायात मदत करतो.

शाळेत असताना प्रियामणीने साड्यांच्या जाहिरातींमध्ये काम केले आहे. प्रियामणीने मानसशास्त्र विषयात बीए केलं आहे. २००३ मध्ये तिने ‘एवरे अतागाडू’ या तेलगू चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. २००४ मध्ये तिने ‘सत्यम’ चित्रपटातून मल्याळम चित्रपटसृष्टीतही पदार्पण केलं. तिचे पदार्पणातील काही चित्रपट अपयशी ठरले. २००६ मधील ‘पेल्लाईना कोथालो’ हा तेलगू चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटाने प्रियामणीला प्रसिद्धी मिळवून दिली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Mani Raj (@pillumani)

तेलगू आणि मल्याळम चित्रपटांशिवाय प्रियामणीने तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रावण’ चित्रपटात भूमिका साकारत तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. त्याच वर्षी तिला राम गोपाल वर्माच्या ‘रक्त चरित्र २’ या चित्रपटातही काम करण्याची संधी मिळाली. ‘द फॅमिली मॅन २’ या वेब सिरीज मध्येही ती झळकली आहे. ऍमेझॉन प्राईम वर अलीकडेच तिचा ‘नारप्पा’ हा तेलगू चित्रपट प्रदर्शित झाला. प्रियामणी सध्या काही हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. लवकरच तिचे हे चित्रपट प्रदर्शित होतील, अशी आशा करायला हरकत नाही.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Mani Raj (@pillumani)

प्रियामणीने अनेक तेलगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आता हिंदी मध्येही ती आपल्या अभिनयाची जादू दाखवताना दिसत आहे. तुम्हाला प्रियामणीचा अभिनय आवडतो का? तिचा कोणता चित्रपट तुम्हाला जास्त आवडतो, ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा.