बॉलीवूडचे हे ‘भयानक खलनायक’ ज्यांच्या नावाने थर-थर कापायचे लोक, अखेरच्या क्षणी झाला खऱ्या जीवनात असा दुर्दैवी मृत्यू..

मित्रहो बॉलिवूड मध्ये अनेक कलाकार कार्यरत आहेत, काहींनी आपल्या कलेतून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे त्यांचे अस्तित्व जरी नसले तरीही त्यांची ओळख नेहमीच टिकून राहते. आज आपण काही प्रसिद्ध खलनायकाची माहिती घेणार आहोत. तसेच त्यांच्या मृत्यूमागे असणारे कारण सुद्धा जाणून घेणार आहोत. या खलनायकांनी आपल्या दमदार अभिनयातून एक वेगळाच दरारा निर्माण केला आहे. रसिक त्यांना आजही घाबरतात, पण त्यांच्या मृत्यूचे कारण ऐकून तुम्हीही थक्क होऊन जाल.

रामी रेड्डी
आपणाला ९० च्या दशकात प्रसिद्ध असलेले खलनायक रामी रेड्डी माहीतच असतील, त्यांनी आपल्या दमदार अभिनयातून प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. त्यांचा अभिनय अगदी खऱ्या आयुष्यात सुद्धा लोकांना घाबरवत होता, लोक रियल लाईफ मध्ये सुद्धा त्यांना घाबरू लागले होते. त्यांनी जवळपास २०० चित्रपटात काम केले आहे. पण आयुष्याच्या अखेरीस त्यांना एका रोगाने जखडले होते म्हणून त्यांना आपला जीव खूप वाईट पद्धतीने गमवावा लागला. या रोगामुळे शेवटी त्यांचा हाडाचा सापळा झाला होता, अखेर १४ एप्रिल २०११ मध्ये त्यांनी जीव सोडला.

माणिक हिराणी
तसेच जॉकी श्रॉफचा चित्रपट “हिरो”, यातून प्रसिद्ध झालेला खलनायक “बिल्ला” म्हणजेच माणिक हिराणी अनेकांना आपल्या अभिनयातून घाबरवून सोडतो. त्याने सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक चित्रपटात काम केले होते. पण खूपशा चित्रपटातून काम करून सुद्धा त्याला लोक “बिल्ला” या नावानेच ओळखतात. त्याच्या अभिनयाला अनेकांनी भरपूर पसंती दिली असली तरी लोक त्याला खुप घाबरत होते मात्र शेवटी त्याला दुःखद मृत्यू आला, ज्याचे कारण आजही समोर आले नाही..

महेश आनंद
तसेच बॉलिवूड मध्ये महेश आनंद हे सुद्धा खलनायक म्हणून भरपूर प्रसिद्ध आहेत, त्यांना बॉलिवूड मधील खतरनाक खलनायक म्हणून ओळखतात. ते उत्तम डान्सर असून उत्तम ऍक्टर देखील होते. तसेच त्यांची बुद्धिक्षमता सुद्धा अनेकांना थक्क करून सोडत होती, ते खूप टॅलेंटेड होते. मात्र २०१९ मध्ये त्यांचे दुःखद निधन झाले होते, त्यांचे प्रेत जवळपास २ दिवस घरात पडून होते. ते एकटेच राहत होते, ५७ वर्षाचे असताना त्यांचे निधन झाले होते. जेव्हा त्यांचे प्रेत दोन दिवस पडून होते तेव्हा टीव्ही सुरू होती, त्यांच्या शेजारी दारूची अर्धी बाटली होती तसेच प्लेट मध्ये जेवण सुद्धा होते.

९० च्या दशकातील आणखीन एक खलनायक ज्याने आपल्या कलेच्या जोरावर भरपूर लोकप्रियता मिळवली आहे. मात्र अनेक लोक आजही त्याच्या अभिनयाला घाबरतात, त्याने जलवा, मोहरा, सडक, तडीपार, चमत्कार यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. त्याने सलमानचा बॉडीगार्ड तसेच संजय दत्त पर्यंतच्या बॉडीगार्डना ट्रेन केले आहे. तसेच सुनील शेट्टीला सुद्धा ट्रेन केले आहे. त्याला श्वासाचा त्रास होत, त्यामुळे २०१२ मध्ये त्याचे निधन झाले होते.

तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.