या छोट्या चुकांमुळे या ४ कलाकारांचे बॉलिवूडमधील करिअर झाले नाहीसे! संजय दत्तने तर…

मित्रानो कधीकधी कलाकारांच्या छोट्या चुकीमुळे त्यांना खूप काही गोष्टी गमवाव्या लागतात. एखादी गोष्ट आपल्या हातून चुकीची घडली तरी त्याचा नंतर काही काळानंतर पश्चात्ताप करून काय उपयोग..? एखाद्या चुकीच्या गोष्टीमुळे काम जाते सुद्धा किव्हा कधीकधी मिळते सुद्धा! पण आपण आपली समाजात ओळख कशी बनवतो यावर सगळं काही अवलंबून असत. खूप साऱ्या चुका केल्यामुळे बॉलिवूडमधील खूप साऱ्या कलाकारांना याचे परिणाम भोगावे लागले आहेत.

सनी देओल – धर्मेंद्र यांचा मुलगा म्हणून ओळख मिळवलेला अभिनेता सनी देओल. पण नंतर त्याने स्वतःच्या कामातून आपली विशेष ओळख बनवली. एक काळ असा होता की सनी देओलचा डायलॉग ”ये ढ़ाई किलो का हाथ जब किसी पर पड़ता है तो आदमी उठता नहीं उठ जाता है” हा सर्वाना घायाळ करायचा पण आता त्याला काम मिळणे कठीण झाले एकेकाळी कामातून थोडा ब्रेक घेतलेला सनी देओल याला नंतर काम मिळणार नाही हे माहीत न्हवते ते त्याला खूप महागात पडले.

संजय दत्त – आपला आवाज आणि शरीराच्या बळावर गुंडगिरी आणि भाईगिरी अश्या चित्रपटात विशेष ओळख मिळवलेला अभिनेता संजय दत्त याला १९९३ मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटच्या प्रकारामुळे बॉलिवूडमध्ये काम मिळने अवघड झाले. या गोष्टीमुळे संजय दत्त यांना तुरुंगावास झाला होता. साधारण यावर २३ वर्षे खटला चालू राहिला. त्या सर्व गोष्टीवर आधारित ‘
‘संजू’ हा चित्रपट पहायला मिळेल.

करिश्मा कपूर – करिश्मा कपूरने ९० च्या काळात खूप साऱ्या चित्रपटात कामे करून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले होते. त्या काळात ती खूपच सुप्रसिद्ध अभिनेत्री होती. पण लग्न झाल्यानंतर ती चित्रपटातून लांब राहू लागली आणि पण नंतर जेव्हा ती पुन्हा चित्रपटात आली तेव्हा तिला प्रेक्षकांनी प्रतिसाद देणे सोडून दिले. आणि तिचे खूपसे चित्रपट त्यावेळी फ्लोफ झाले. त्यानंतर तिचे फिल्मी करिअर थांबले.

ऐश्वर्या रॉय – एकेकाळी आपल्या सौंदर्यने सर्वाना भुरळ घालणारी ऐश्वर्या रॉय सध्या फिल्मी जगतापासून खूपच लांब आहे. ऐश्वर्या रॉय आज जरी चित्रपटात दिसत नसली तरी तिची चर्चा सतत होत असते. जेव्हा डिलिव्हरीवेळी तिचे वजन वाढले आणि एका जाहिरातीवेळीचे तिचे फोटो व्हायरल करण्यात आले तेव्हा त्यावर खूप लोकांनी टीका केली. जेव्हा ती गरोदर राहिली तेव्हापासून ती फिल्मी दुनियेपासून खूप लांब आहे.