या कारणामुळे मुंबई सोडून कायमचे लंडन मध्ये स्थायिक होणार देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी..

देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी लंडनमध्ये स्थायिक झाल्याची बातमी सोशल मीडियावर आगीसारखी पसरली आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी ब्रिटनमध्ये स्थायिक झाल्याच्या वृत्तावर लोक प्रतिक्रिया देत आहेत आणि सोशल मीडियावर त्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. मिड डे या इंग्रजी वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, मुकेश अंबानी आपल्या कुटुंबासह लंडनमध्ये राहणार आहेत. अंबानी कुटुंब ब्रिटनमधील बकिंगहॅमशायरच्या स्टोक पार्कमधील त्यांच्या आलिशान घरात राहण्याची तयारी करत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी यांचे ब्रिटनमधील आलिशान घर पूर्ण झाले आहे. त्यांनी स्टोन पार्कमध्ये ५९२ कोटी रुपयांमध्ये एक आलिशान घर तयार केले असून त्यात ४९ हून अधिक खोल्या, स्विमिंग पूल, मिनी हॉस्पिटल, क्लब, ऑडिटोरियम, पार्क, ओपन एरिया आहे, तर घरासाठी वेगळा रस्ता तयार करण्यात आला आहे. हे आलिशान घर ३०० एकरपेक्षा जास्त जागेत तयार करण्यात आले आहे. घरात विशेष मंदिराची स्थापना केली आहे. राजस्थानमधून संगमरवरी बनवलेल्या श्रीकृष्ण, हनुमान आणि गणेशाच्या मूर्ती तेथे नेऊन स्थापित केल्या आहेत. बातम्यांनुसार, मंदिराची रचना अगदी तशीच आहे जी त्यांनी मुंबईतील घर आणि ऑफिसमध्ये ठेवली आहे.

वास्तविक, को’रो’ना म’हा’मा’री आणि लॉ’क’डा’ऊनच्या काळात अंबानी कुटुंबाला दुसऱ्या घराची गरज भासू लागली. मोकळ्या जागेच्या घराची गरज त्यांच्या लक्षात आली, त्यानंतर स्टोनपार्कच्या या घराचा व्यवहार झाला आणि आता हे घर तयार झाले आहे. वृत्तानुसार, दिवाळीच्या पूजेनंतर अंबानी कुटुंब पुढील वर्षी एप्रिलमध्ये येथे शिफ्ट होऊ शकते. मात्र, मुकेश अंबानी आपला वेळ मुंबई आणि लंडन या दोन्ही ठिकाणी घालवणार आहेत.

यूकेला जाण्याच्या वृत्ताबाबत रिलायन्स इंडस्ट्री किंवा अंबानी कुटुंबाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, परंतु अंबानी कुटुंब गेल्या अडीच महिन्यांपासून त्यांच्या मुंबईतील घराबाहेर आहे, त्यानंतर त्याच्या अटकळांना जोर आला आहे. . या बातमीवर विश्वास ठेवला तर, अंबानी कुटुंब लंडनमधील त्यांच्या नवीन घरात शिफ्ट होण्याच्या तयारीत आहे. मात्र, आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही. ही बातमी सोशल मीडियावर आल्यानंतर लोकांकडून त्यावर भरभरून प्रतिक्रिया येत आहेत.