दोन विवाह करून देखील गोविंदाबरोबर काम करणारी ‘ही’ अभिनेत्री आई बनण्यात ठरली अक्षम..

प्रत्येकाच्या आयुष्यात आईवडील होणे हे सर्वात मोठे सुख असते. यापेक्षा कोणतेच सुख मोठं नसते. प्रत्येक जोडप्याच स्वप्न असत की, आपल्याला एखादतरी गोंडस बाळ व्हावं. प्रत्येक आईवडील आपल्या मुलाबाळांसाठी त्यांना हवं ते मिळवून देण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात. प्रत्येकजण आपल्या बाळासाठी सप्न बघत असतो. मात्र, काही जोडपी अशी देखील आहेत की त्यांना बाळ असण्याची प्रचंड इच्छा असून देखील त्यांना बाळ होवू शकत नाही.

मात्र, मूल न झाल्यामुळे अनेक जोडपी एकमेकांना दोष देवून निराश होतात. अशा वेळी मात्र सुखी संसाराध्ये विरजण पडल्याशिवाय राहत नाही. यामुळेच अनेकदा घटस्फोट देखील होतात. बॉलीवूडमधील अनेक कलाकार देखील आईवडील होवू शकत नाहीत. विवाहित असून देखील आईवडील बनण्यात अक्षम ठरले आहेत.

1990 च्या काळातील सुप्रसिद्ध अभिनेत्री नीलम कोठारीने नुकताच तिचा 52 वा वाढदिवस साजरा केला आहे. तिचा जन्म 9 नोव्हेंबर रोजी हाँगकाँगमध्ये झाला होता. तिने बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. जरी ती आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी देखील ती आजकाल तिच्या व्यवसायात नाव कमावत आहे.

नीलमचा पहिला चित्रपट ‘जवानी’ होता. जो 1984 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि करण शाह ने त्यात मुख्य नायकाचे पात्र निभावले होते. हा चित्रपट फ्लॉप झाला असला तरी नीलमच्या अभिनयाचे कौतुक केले गेले होते आणि तीला बॉलीववूड क्षेत्रामध्ये चांगलाच ब्रेक मिळाला होता. त्यानंतर नीलमला अनेक चांगल्या ऑफरसुद्धा मिळाल्या होत्या.

त्यानंतर मात्र निलमला मागे वळून पाहावे लागले नाही. एकामागून एक चित्रपटांची रांग लागली होती. मात्र, हवे तसे यश मात्र मिळत नव्हते. निलमचे नशीब पालटले ते सुपरस्टार गोविंदाच्या बॉलिवूड पदर्पणामुळे.. नीलमने गोविंदाचा “इल्जाम” चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली. हा चित्रपट गोविंदाचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर तिने गोविंदाबरोबर 10 चित्रपटांमध्ये काम केले. त्यापैकी सहा चित्रपट सुपरहिट ठरले.

तिने नीलमने चंकी पांडे, सलमान खान, आमिर खान यांच्यासह चित्रपट केले आहेत. 2001 मध्ये तिला ‘कसम’ या चित्रपटात शेवटचे मोठ्या पडद्यावर पाहिले गेले होते. या व्यतिरिक्त नीलमने ‘कुछ कुछ होता है’, ‘हम साथ साथ साथ हैं’ असे अनेक चित्रपट केले आहेत. नीलम यांनी गोविंदासमवेत ‘लव्ह’ 86 ‘,’खुडगर्झ, मर्डर, माईटी ‘सारख्या हिट फिल्म्स दिल्या. तिने सलमान खानसोबत ‘एक लडका एक लडकी’ मध्ये काम केले होते आणि हा चित्रपट हिट ठरला होता.