प्रसिद्ध कथक नृत्यकार पंडित बिरजू महाराज यांचे निधन…..सर्वत्र शोकांतिका!

मित्रहो कलाकार हा नेहमीच रसिकांच्या मध्ये जिवंत असतो, मात्र त्याच्या आठवणींपेक्षा त्याच अस्तित्व खूप मोलाचे असते. तरीही काही कलाकार आपले अस्तित्व जरी नेले असले तरीही आपल्या कलेतून सर्वत्र झळकत आहेत. पण नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली बातमी अनेकांच्या पाया खालची जमीन सरकवत आहे. कलाक्षेत्रात नाविन्यपूर्ण यश संपादन करून कथक नृत्यप्रकारात लोकप्रिय आणि प्रसिद्ध झालेले पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलेले पंडित बिरजू महाराज हे निधनाच्या वेळी ८३ वर्षाचे होते. त्यांनी रविवारी मध्यरात्री आपला प्राण मोकळा केला, आणि आपल्या सर्व परिवाराला,रसिक मित्रांना सोडून ते स्वर्गीय झाले. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. अनेक नेटकरी ही बातमी पाहून थक्क झाले आहेत. सर्वजण आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर पंडित बिरजू महाराज यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

पंडित बिरजू महाराज यांनी दिल्लीतील साकेत हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास मोजला. गेल्या रात्री १२:१५ ते १२:३० दरम्यान त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना त्यावेळी हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाच्या वार्तेवर शोक करत योगी आदित्यनाथ म्हणतात की कथक सम्राट पद्मविभूषित बिरजू महाराज यांचे निधन अत्यंत दुःखद झाले. प्रभू रामचंद्रांना माझे सांगणे आहे की या पवित्र आत्म्याला आपल्या पायाशी स्थान दे व त्यांच्या जाण्याचे दुःख सहन करण्याची सर्वाना शक्ती दे.

तसेच मालिनी अवस्थी म्हणतात की आज भारतीय संगीताची लय थांबली आहे. सूर मौन झाले आहेत, भाव शून्य झाले आहेत. कथकचे सम्राट असलेले पंडित बिरजू महाराज आता राहिले नाहीत. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. तसेच बॉलिवूड गायक अदनान सामी ने सोशल मीडियावर लिहले “की महान कथक के पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाची वार्ता ऐकून मी खूप दुःखी झालो आहे.”, सोशल मीडियावर अनेकांनी पंडित बिरजू महाराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ मध्ये लखनऊ येथे झाला होता. त्यांचे खरे नाव पंडित बृजमोहन मिश्रा असे आहे. ते कथक नर्तकी सह शास्त्रीय गायक देखील होते. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्र अपूर्ण राहिले आहे, अनेक कलाकार भावुक झाले आहेत. पण जरी त्यांचे अस्तित्व नसले तरीही त्यांच्या कलेने आजही आपल्यात त्यांना जिवंत ठेवले आहेत, आणि संगीतातील त्यांच्या श्वासाला दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. अमच्यावतीने देखील पंडित बिरजू महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!