फँड्री फेम अभिनेत्री झळकणार बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर! पहा कोणता आहे हा नवा चित्रपट…

मित्रहो मराठी चित्रपट सृष्टीत अनेक चित्रपट नावारूपाला आलेले आहेत, त्यातीलच “फँड्री” हा नागराज मंजुळे दिग्दर्शित भरपूर लोकप्रिय झाला आहे. या चित्रपटात झळकलेल्या सर्व कलाकारांना भरपूर प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली असून यातून आणखीन एक अभिनेत्री चर्चेत आली आहे आणि ती अभिनेत्री म्हणजे सर्वांची लाडकी राजेश्वरी खरात होय. राजेश्वरीने आजवर फँड्री, आयटमगिरी यांसारख्या चित्रपटातून रसिकांना भेट दिली होती. मात्र आता लवकरच ती बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

तिने फँड्री चित्रपटात शालू नावाच्या एका शाळकरी मुलीची भूमिका साकारली होती. या भूमिकेला रसिकांनी छान प्रतिसाद दिला होता. आता राजेश्वरी आपल्याला हिंदी सिनेमात दिसणार असून, ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत आहे. हा चित्रपट कसा असेल याची उत्सुकता शिगेला पोहचत चालली आहे. याचे नाव “पुणे टू गोवा” असे असून याची निर्मिती आदित्यराजे मराठे प्रॉडक्शन हाऊस यांनी केली आहे.

“पुणे टू गोवा” या चित्रपटात आपणाला खूप काही नवीन पहायला मिळणार आहे. यामध्ये कॉमेडी देखील आहे, थ्रिल सुद्धा आहे तसेच सस्पेन्स सुद्धा आहेच आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऍक्शन सुद्धा पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट वास्तविक जीवनावर आधारित असून आयुष्यातील संघर्षाला तोंड देत मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यावर आहे. यातील कथा थेट काळजात घर निर्माण करते. अगदी कोणालाही सहज आपलेसे बनवेल अशी ही कथा आहे.

या कथेतून काही रोमांचक किस्से, रहस्यमय घटना, तसेच प्रवास करत असताना येणाऱ्या धोकादायक परिस्थितीला उघडपणे दर्शविण्यात आले आहे. असे स्वतः चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल भगत यांनी सांगितले आहे. हा चित्रपट अनेकांचे लक्ष वेधून आहे, तसेच रसिक मंडळी खूप आस लावून याच्या येण्याची वाट पाहत आहेत. या चित्रपटात आता मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री राजेश्वरी हिला संधी मिळणार हे पाहून तिचे अनेक चाहते आनंद व्यक्त करत आहेत.

राजेश्वरी ही सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असते, ती नेहमीच आपले सुंदर सुंदर फोटो शेअर करत असते. तिच्या या प्रगतीवर तिचे सर्व चाहते खुप खुश आहेत. पुढेही तिची अशीच प्रगती होवो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.