‘मैने प्यार किया’ चित्रपटामधील अभिनेत्री भाग्यश्रीच्या मुलीचे ग्लॅमरस फोटो पाहून चाहते घायाळ

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान याचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट होतोच. त्याच्या चित्रपटातील प्रत्येक डायलॉग चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. सलमान खानचा सुपरहिट झालेला चित्रपट ‘मैने प्यार किया’ यामध्ये त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री भाग्यश्री दिसली होती. तिला या चित्रपटाच्या माध्यमातून अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

मैने प्यार किया’ या चित्रपटामुळे भाग्यश्रीचे अनेक चाहते झाले आहेत. भाग्यश्रीने अनेक मोठमोठ्या सुपरहिट अभिनेत्यांबरोबर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री भाग्यश्रीचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा फॅन फ्लोईंग आहे. एकेकाळी तिचे गाजलेले चित्रपट चाहते आज देखील तितक्याच आवडीने पाहतात.

अभिनेत्री भाग्यश्री सध्या 52 वर्षांची असून ती विवाहित आहे. तिचं वय इतकं असून आज देखील ती प्रचंड सुंदर दिसत आहे. तिने बॉलीवूड क्षेत्राला रामराम ठोकून लग्न केले. लग्नानंतर तिने एका मुलीला जन्म दिला असून ती आता मोठी झाली आहे. भाग्यश्रीची मुलगी आता तिच्या पेक्षाही प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.

भाग्यश्रीच्या मुलीचं नाव अवंतिका असून, ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्याचबरोबर ती तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेचा विषय बनते. तस पाहिलं तर, भाग्यश्रीपेक्षा तिची मुलगी अवंतिकाचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा फॅन फ्लोईंग आहे.

अवंतिका नेहमीच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे नवनवीन लूकमधील ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिने केलेल्या प्रत्येक पोस्टवर तिचे चाहते प्रचंड कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव करत असतात. तर काही वापरकर्ते तिला ट्रोल देखील करताना पाहायला मिळतात.

इतर अभिनेत्री आणि अभिनेत्यांप्रमाणेच भाग्यश्रीने देखील तिची मुलगी अवांतिकाला परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी पाठवले आहे. त्यामुळे तिची विचार क्र्याची क्षमता देखील उंचावली आहे. ती तिच्या आईप्रमाणेच मॉडर्न विचारांची आहे. तसेच ती शिक्षणाच्या बाबतीत देखील प्रचंड हुशार आहे. तिला मॉडर्न अंदाजात रहायला देखील खूप आवडते.