या प्रसिद्ध कलाकारांनी खऱ्या पात्राशी जुळणारा हुबेहूब मेकअप करून केले सर्वाना चकित..

हल्लीच सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग यांचा क्रिकेट वर आधारित नवीन चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या नव्या चित्रपटाचे नाव ८३ असे आहे या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे रणवीर सिंग जी भूमिका साकारत आहे ती भूमिका सुप्रसिद्ध क्रिकेटपटू कपिलदेव यांची आहे. त्यांच्या भूमिकेचा मेकअप रणवीर सिंग याला करून झाल्यावर हुबेहूब कपिल देव यांच्या सारखा दिसत होता. दिसल्या बाबत रणवीर सिंग कपिल देव यांचा सारखा दिसत होता पण या व्यतिरिक्त तो त्यांच्या बोलण्याची शैली तीन ची वागणूक या पद्धती वापरून त्याने सर्वांच्या मनात आपले स्थान निर्माण केले.

रणवीर सिंग यांचा “प्रोस्थेटिक मेकअप “मुळे इतका परफेक्ट झाला होता की ते खरंच कपिल देव आहेत की काय असे वाटत होते..! फेस कट पासून हिरो पर्यंत ते कपिलदेव सारखे दिसत होते. रणवीर यांना पाहून कोणीही म्हणणार नाहीत की हे रणवीर सिंग आहेत याचे ऐवजी ते नक्कीच म्हणतील कपिल पाजी आपण येथे कसे..?

अभिनेता रणवीर सिंग यांनी याच्या आधी सुद्धा खूप सार्‍या बायोपीक चित्रपटात स्वतः काम करून अचंबित करणारे वातावरण निर्माण केले होते. त्यांच्या मागील खूप चित्रपटात त्यांचा लूक हुबेहूब त्या पात्रासाठी अव्वल ठरायचा. जाणून घेऊया असे कोणकोणते स्टार आहेत ज्यांनी मेकअप चा सहारा घेत लोकांना अचंबित करून सोडले.

दीपिका पादुकोण
२०२० मध्ये आलेली दीपिका पादुकोण यांची फिल्म छपाक ही एसिड अटैक सरर्वाइवर लक्ष्मी अग्रवाल यांच्यावर होती. चित्रपटाचा ट्रेलर लोकांच्या समोर येतात दीपिका पादुकोण यांना पाहून लोकांनी अक्षरशः कुतूहल केले होते. चित्रपटात दीपिका रियल लक्ष्मी अग्रवाल यांची कार्बन कॉपी वाटत होती.

विकी कौशल
अभिनेता विकी कौशल यांची नुकताच अभिनेत्री कॅटरिना कैफ यांच्यासोबत विवाह झाला आहे. लग्नाचे चर्चे बरोबरच अभिनेता विकी कौशल याच्या आगामी चित्रपटाची देखील सर्वत्र चर्चा आहे. त्यांची नवीन फिल्म सैम बहादुर ही असणार आहे. विकी कौशल पुन्हा या नवीन बायोपिक द्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सॅम बहादूरमध्ये विकी कौशल मार्शल सॅम माणेकशॉची भूमिका साकारणार आहे. सॅम माणेकशॉच्या लूकमधील विकीचा पोस्टर रिलीज झाला आहे. दोघांच्या दिसण्यात समानता दिसत आहे.

लारा दत्ता
अभिनेत्री लारा दत्ता यांनी यंदाच्या बेट बॉटम या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती. लाराचा इंदिरा गांधी लूक बॉलीवूडमधील आतापर्यंतचा सर्वोत्तम मानला गेला आहे. तुम्ही त्याचे काही वर फोटो देखील पाहू शकता.