पोटच्या मुलासाठी बापच काळीज काय करेल ते सांगता येत नाही; १५ हजार कमवनाऱ्या वडिलांनी मुलाच्या श’स्त्रक्रियेसाठी जमवले तब्बल १ कोटी ७० लाख..

जगातील प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांची खूप काळजी असते. ते आपल्या मुलांसाठी वाटेल ते करायला तयार असतात. आई प्रमाणेच वडील देखील आपल्या मुलांवर प्रचंड प्रेम करतात. कधी कुठली गोष्ट मागितली पैसै नसले तरी देखील मुलांसाठी वडील मोठ्या धडपडीने मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न करत असतात. मध्यप्रदेश मधील दरमहा १५ हजार कमवणाऱ्या वडिलांनी त्यांच्या मुलाच्या उपाचाराठी तब्बल १ कोटी ७० लाख रुपये जमवले आहेत.

मध्यप्रदेशमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीचे नाव सागर मेश्राम असे असून, त्यांच्या मुलाचे नाव प्रियांशू असे आहे. प्रियांशू गेल्या सहा वर्षांपासून एका गंभीर आजाराशी दोनहात करत आहे. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी रात्रंदिवस एक करून सागर हे पैसे जमा करत आहे. जेणेकरून ते आपल्या मुलावर उपचार करून त्याचा जीव वाचवू शकतील.

सागर पिझ्झा डिलिव्हरीचे काम करत असून, या कामातून त्यांना महिन्याला केवळ १५ हजार रुपये पगार मिळतो. सागर गेल्या ३ वर्षे ८ महिन्यापासून आपल्या मुलाच्या उपचारासाठी पैसे जमवत आहे. इतक्या वर्षांपासून त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे त्यांना उपचारासाठी लागणारी १ कोटी ७० लाख इतकी रक्कम जमवण्यात यश आले आहे.

अमेरिकेतल्या बॉस्टन चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्ये प्रियांशूवर उपचार करण्यात येणार आहे. फेब्रुवारीमध्ये त्याला उपचारासाठी अमेरिकेत पाठवणार असून, सागर भोपाळच्या भदभदा परिसरात राहतो. प्रियांशू लहान असताना त्याची अचानक त्याची तब्बेत बिघडली होती. त्यावेळी तो फक्त चार महिन्याचा होता. त्याला दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला गंभीर आजार असल्याचे नमूद केले.

प्रियांशूला ‘डबल आऊटलेट राईट वेन्ट्रिकल विथ लार्ज मस्क्युलर वेन्ट्रीक्युलर सेप्टल डिफेक्ट’ असा आजार असल्याचे डॉक्टरांनी सागर यांना सांगितले. या आजारात हृदयात एक मोठे छेद असते. त्यामुळे हृदयातील रक्त मोठ्या वेगाने फुफ्फुसात जाते. प्रियांशू उपचारासाठी सुरुवातीला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात नेण्यात आले होते.

मात्र, तिथे असे डॉक्टरांनी सांगितले की, याचा उपचार जन्म झाल्यानंतर एक ते दोन आठवड्यात होणे गरजेचे होते. एम्सच्या डॉक्टरांनी दिल्लीतील फॉर्टीस रुग्णालयातील डॉ. एस के अय्यर यांची भेट घेण्यास सांगितले. डॉक्टरांना भेटल्यानंतर त्यांनी प्रियांशूवर तीन शस्त्रक्रिया कराव्या लागतील मात्र, प्रियांशू दहा वर्षांपेक्षा जास्त जगू शकणार नाही. असे स्पष्ट केले.

२०१५ मध्ये प्रियांशूची पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी बाल स्वाथ्य अभियानातून १ लाख रुपये त्यांना मिळाले होते. पुढची शस्त्रक्रिया दोन वर्षांनी होती. मात्र त्यांची आर्थिक परस्थिती हालाकीची असल्याने त्यांना मुंबईत राहणे परवडणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी पुण्यात येऊन पिझ्झा डिलिव्हरीचे काम सुरू केले. यात त्यांना महिन्याला १५ हजार रुपये मिळत होते.

प्रियांशूच्या दुसऱ्या शस्त्रक्रियेसाठी सागरने भोपाळमधील घर विकले. मात्र, ते डॉक्टरांकडे गेले त्यावेळी त्यांनी दुसऱ्या शस्त्रक्रियेला खूप उशीर झाल्याचे सांगितले. त्यामुळे सागर मुंबई, बंगळुरू, हैद्राबाद सारख्या मोठमोठ्या शहरातल्या हॉस्पिटलमध्ये गेले. या आजाराविषयी त्यांनी सोशल मीडियावर माहिती काढली. त्यावरून त्यांना अमेरिकेच्या एका हॉस्पिटलमध्ये याचा उपचार शक्य आहे, अशी माहिती मिळाली.

सागर यांनी रुग्णालयाला इमेल केला. त्यावेळी हॉस्पिटलने सागर यांना ५० हजार रुपये भरण्यास सांगितले. मात्र, सागर यांच्याकडे पैसे नव्हते. सागर यांनी आपली सगळी कहाणी हॉस्पिटलला सांगितली. त्यावर उपचार शक्य आहे, त्यासाठी ६५ हजार भरण्यास अमेरिकेच्या हॉस्पिटलने सांगितले. पुढे हाच खर्च १ कोटी ७० लाखांवर गेला.

दरम्यान, प्रियांशूचे वडील सागर यांनी दिवसरात्र मेहनत करून, रस्त्यावर उतरून, सोशल मीडियावर मदत मागून मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी मदत मागितली. त्यांचे हे अतोनात कष्ट व मुलाच्या जीवसाठी वाटणारी ओढ पाहून अनेकांनी त्यांची मदत केली. आता लवकरच प्रियांशूवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.