देव देव देव दे! या कारणांमुळे सारा अली खान करते देवदर्शन, कारण ऐकून तुम्हाला वाटेल कौतुक…

मित्रहो प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची प्रत्येकाची एक वेगळी नजर असते, एक निराळा दृष्टिकोन असतो. तो आपण बदलू शकत नाही, मात्र त्यावर विचार करू शकतो. आपल्या वाचनात, पाहण्यात नेहमीच निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टी येत असतात त्यामुळे आपण अलगद समाजाशी जोडले जातो. कधी राजकीय बातमी वाचनात येते तर कधी मनोरंजन क्षेत्रातील बातमी वाचनात, पाहण्यात येते. त्यामुळे नेहमीच सोशल मीडियावर, सर्वत्र चर्चेला भलतेच उधाण आलेले असते.

हल्ली बॉलिवूड मधील एक बातमी अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे आणि लक्ष वेधून घेण्यासारख्याच व्यक्तीबद्दल ही बातमी आहे. यामध्ये सारा अली खान खूप चर्चेत आली असून अनेकजण तिच्यावर कमेंट करत आहेत. सारा ही आता मनोरंजन क्षेत्रातील चमकता तारा आहे, सर्वत्र तिची प्रचंड लोकप्रियता आणि प्रसिद्धी झळकत आहे. तिचा अतिउत्कृष्ट अभिनय भलतेच वेड लावतो, त्यात तिची निरागस सुंदरता अनेकांना भावते.

सारा ही खूप वेगळी अभिनेत्री आहे, इतर अभिनेत्रींच्या तुलनेत तिचा स्वभाव कोणालाही विचार करायला भाग पाडेल असाच आहे. ती खूप श्रद्धाळू आहे, अनेकदा आपल्याला ती वेगवेगळ्या मंदिरात दिसते. कधी ती दर्ग्यात असते तर कधी ती गुरुद्वारे मध्ये असते तर कधी चक्क ती मंदिरात दिसते. त्यामुळे अनेक नेटकरी तिच्या या देवदर्शनाच्या सवयीवर कमेंट करत असतात. आपल्या देशात खूपशा प्रकारचे, जातीचे, धर्माचे लोक राहतात. धर्म वेगळे असल्याने मंदिर सुद्धा वेगळे आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

सारा मात्र प्रत्येक मंदिरात अगदी भक्तीने जाते. जेव्हा एका मुलाखती मध्ये तिला विचारण्यात आले की “तू वेगवेगळ्या मंदिरात का बरं जाते?” तेव्हा ती म्हणते की मी धार्मिक आहे म्हणून मंदिरात जात नाही, तर मी अध्यात्मिक आहे म्हणून मंदिरात जाते. देवदर्शन करते. मला ती पवित्र ऊर्जा आवडते. मग ती गुरुद्वारेतून मिळो किंवा दर्ग्यातून मिळो किंवा मग कुठल्या मंदिरातून मिळो. मला देवदर्शन घेऊन पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. म्हणून मी कधी मंदिरात जाते तर कधी दर्ग्यात.

साराचे हे उत्तर आपल्याला खूप काही शिकवून जाते, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. अखेर आपण जात धर्म सारले तर लक्षात घेण्यासारखे इतकेच आहे की आपण सर्वात आधी एक माणूस आहोत जो कोणत्याच बंधनात बांधील नसतो. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.