या कारणामुळे लग्नाआधी अभिनेत्री ऐश्वर्या रॉयने पिले होते विष, झाली होती गंभीर परिस्थिती..

मित्रहो बॉलिवूड मधील सौंदर्याची खान मानली जाणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या रायला कोण नाही ओळखत, तिच्या सुंदरतेवर तर आजही रसिक घायाळ होतात. तिने आपल्या अदाकारीने हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक सिनेमे केले आहेत, तिचा उत्कृष्ट अभिनय नेहमीच आपल्या भेटीस आला आहे. ऐश्वर्याला तिच्या सौंदर्यासाठी विदेशात देखील मानतात, तिला पसंत करतात. त्यामुळे तिच्या जोडीदाराबद्दल सुद्धा नेहमीच उत्सुकता राहिली होती. पण अभिषेक सोबत आपली लग्नगाठ बांधली आहे, त्यांची जोडी खूपच सुंदर दिसते.

अभिषेक आणि ऐश्वर्या दोघेही उत्तम कलाकार आहेत, तसेच त्यांच्या बच्चन नावामुळे तर आणखीनच ते दोघे लोकप्रिय आहेत. कारण अमिताभ बच्चन हे बॉलिवूडचे आत्मा आहेत, त्यांच्या अनेक चित्रपटांनी आजवर रसिकांना चित्रपट प्रेमी बनवून ठेवले आहे. त्यामुळे हे बच्चन कुटुंब आणि त्यांची सून ऐश्वर्या सुद्धा नेहमी चर्चेचा विषय बनत असतात. ऐश्वर्याने २००७ मध्ये अभिषेक बच्चन याच्याशी लग्न केले होते. त्यानंतर २०११ मध्ये त्यांना आराध्या नावाची मुलगी झाली आहे. त्यांचे हे कुटुंब खूप आनंदी वाटते.

पण मित्रहो ऐश्वर्याच्या लग्नापूर्वी असे काही घडले होते की ज्यामुळे चाहत्यांमध्ये सुद्धा चर्चा सुरू झाली होती. या दोघांनी फिल्म “ढाई अक्षर प्रेम के” या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यांच्या या जोडीला लोकांनी खूप पसंत केले होते, त्यांचा अभिनय आणि सोबतच उत्कृष्ट केमिस्ट्री आकर्षक वाटत होती. त्यामुळे हा चित्रपट देखील प्रचंड गाजला होता. तसेच या चित्रपटसोबत अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यात जवळीकता वाढत चालली होती. चित्रपटात काही सीन थक्क करणारे होते, यामध्ये आपण पाहिलेच आहे की ते दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत असतात.

अगदी एकमेकांना वचने देखील दिलेली असतात, मात्र फिल्मच्या क्लायमॅक्स नंतर ऐश्वर्याला दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करावे लागते. त्यामुळे आपल्या प्रेमापासून दूर होण्याच्या भीतीने ऐश्वर्या विष पिते. तर इकडे अभिषेक गुंडांसोबत फाईट करत असतात. पण ऐश्वर्या तिथे विष पिऊन मंडपात पोहचते, आणि जेव्हा लढाई करून अभिषेक तिथे पोहचतात तेव्हा मंडपात देखील मोठ्याने फाईट होते. पण ऐश्वर्या जेव्हा धावत अभिषेक जवळ पोहचते तेव्हा ती बेशुद्ध होते. तिला दवाखान्यात नेण्यात येते, नंतर खूप वेळाने ती पुन्हा शुद्धीवर येते.

शुद्धीवर आल्यावर ती दोघे पुन्हा एकत्र येतात. हा सिन आणि यातील त्या दोघांचा अभिनय आजही रसिकांना मनाला भुरळ घालतो. एक कलाकार म्हणून दोघेही उत्तम आहेत, त्यांनी नेहमीच आपली कला खूप छान सजवली आहे तसेच आपले नाते देखील खूप छान सजवले आहे. त्यांचे हे नाते असेच सुंदर राहावे ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.